भद्रावती : गुळगाव पठार येथील जयश्री स्वयंसहायता समुहाने गावांत प्रथमच सामुहिक शेळीपालनाचा व्यवसाय सुरू केला. आज या व्यवसायामुळे समुहाच्या सदस्यांना कायमस्वरुपी उत्पन्नाचे साधन मिळाले आहे.
गुळगाव पठार भद्रावती वरून २२ किलोमिटर अंतरावर असलेले ७० कुंटुबांचे गाव आहे. गावामधील लोकांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे. मात्र, या व्यवसायातून अनेकांच्या गरजा भागत नाहीत. अनेकांना शेतीला जोडधंदा करण्याची इच्छा असली, तरी अपुèया भांडवलामुळे हे शक्य होत नव्हते. गावाजवळ जंगल असून, तसेच चारा उपलब्ध असतानाही गावामध्ये एकही शेळी नव्हती. त्यामुळे समुहाकडून शेळीपालन करण्याचा विचार पुढे आला. मात्र, आर्थिक पाठबळ नव्हते.
उमेद अभियानातील अधिका-यांनी या गावास भेट दिल्यानंतर शेळीपालनाचा विचार समुहांने त्यांच्या समोर ठेवला. त्यामुळे पशू व्यवस्थापक यांनी समुहाची बैठक घेतली व शेळीपालन विषयी अधिक माहिती दिली. समुहाकडे अधिक पैसे नसल्याने बँकेमाङ्र्कत शेळी व्यवसायाला कर्ज मिळवून देण्यास पशू व्यवस्थापक यांनी सहकार्य केले. बँकेने सुरवातीला ५० हजार रुपये कर्ज मंजुर केले. मात्र, यात व्यवसाय सुरू करणे शक्य नसल्याने बँकेस पुन्हा विनंती करण्यात आली. त्यामुळे बँकेने १ लाख ३० हजार रुपये कर्ज मंजूर केले. से मिळताच तिसèया दिवशी वरोरा तालुक्यातील टेमुर्डा बाजारातून १० शेळी व १ बिजाई बोकड खरेदी करण्यात आला. यासाठी १ लाख रुपये खर्च आला. ३० हजार रुपये इतर कामासाठी शिल्लक ठेवण्यात आले. यापैकी १५ दिवसांत ५ शेळीची प्रसूत झाल्या. प्रत्येकी २ म्हणजे १० पिल्ले मिळाले. अभियानाच्या पशू व्यवस्थापक यांनी वेळोवेळी मार्गदर्शन, शेळीची जोपासना व रोग न व्हावा यासाठी प्रतिबंधात्मक लसी व जंतुनाशकाबाबत मार्गदर्शन केले.
आजघडीला समुहाकडे एकूण १० शेळी व २० पिल्ले झाले आहेत. त्यापैकी १० शेळयाची विक्री करण्यात आली. त्यामधुन समुहास ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले. त्या पैशातून बँक कर्जाची परतङ्केड करण्यात आली. समुहातील महिला या व्यवसायाच्या वाढीसाठी जबाबदाèया वाटून घेतात. या सामुहिक व्यवसायामुळे इतर समुहाने सुद्धा काही नवीन व्यवसाय सुरू करण्याचे प्रयत्न सुरू केले आहे.
विवेक मोतीराम हरणे
तालुका व्यवस्थापक
तालुका
अभियान
व्यवस्थापन कक्ष
भद्रावती