मूल : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत मूल तालुक्यातील गडीसुर्ला येथील शिवपार्वती स्वयंसहायता गटाने सामाजिक बांधिलकी जोपासत जगभर पसरलेल्या कोरोना महामारीच्या काळात विनामुल्य मास्क वितरित केले.
समाजातील गोरगरीब कुटुंबांना जमेल तेवढी मदत करणे, कुठलाही गावपातळीवरील व्यक्ती उपाशी पोटी राहू नये, यासाठी सदरहु बाबीकडे या गटाने विशेष लक्ष पुरविले. त्या सोबतच लोकांना वितरित करण्यासाठी २००० कापडी मास्क याच कालावधीत तयार करून वाटप केले. घरसंसार सांभाळून विनामुल्य मास्क तयार करण्याचे कार्य सखी महासंघाच्या विद्यमान अध्यक्षा सोनाली सुनील शेंडे यांनी केले. ती उमेदच्या समुहाची सदस्या आहे. याशिवाय शिवपार्वती स्वयंसहायता गटाच्या वंदना अगरकाठे यांनी सुद्धा सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कोरोनाच्या संकटसमयी गरजूंना मदतीचा हात दिला.