मूल : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत तालुका व्यवस्थापन कक्ष, मूल येथील स्थापन गटांना अभियानाकडून प्राप्त निधीच्या साहाय्याने महिला स्वयंरोजगाराकडे वळत आहे. याचे उदाहरण म्हणजे तालुक्यातील चितेगाव ग्रामपंचायत मधील आत्मविश्वास महिला बचत गट यांनी स्वतः अभियानाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेऊन घरी राख्या तयार केल्या. या राख्याचा पंचायत समितीसमोर स्टॉल लावण्यात आला होता. श्री. कलोडे, गटविकास अधिकारी मूल यांच्या पुढाकाराने त्यांना राखी विक्रीकरिता पंचायत समितीच्या आवारात एक स्टॉल सुद्धा उपलब्ध करून देण्यात आला.
Post a Comment
0Comments