सिंदेवाही : तालुका कृषी कार्यालय अंतर्गत पंचायत समिती सिंदेवाही येथे दिनांक ९/०८/२०२० ला रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये उमेदच्या गटांचा भरभरून सहभाग नोंदविला.
मानवी आरोग्यात सकस अन्नाचे अनन्यसाधारण महत्व आहे. सकस अन्नामध्ये विविध भाज्यांचा समावेश आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीत जंगलातील तसेच शेतशिवारातील नैसार्गिकरित्या उगवल्या जाणाèया रानभाज्यांचे, रानफळांचे महत्व व आरोग्यविषयक माहिती सर्वसामान्य नागरिकांना होणे आवश्यक आहे. त्या अनुषगाने तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुकास्तरावर रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला. यामध्ये उमेद अभियान qसदेवाही अंतर्गत लोनवाही, नवरगाव, डोंगरगाव, आंबोली, मिनघरी, किन्ही, पवनाचक, कच्चेपार, रामाला, सावरगाठा या गावामधील १५ गटांचा सहभाग होता. यावेळी तरोटा सावरकांदे, पातुर भाजी, कडूभाजी, धोप्याचे पान, काटवल इत्यादी २० रानभाज्या व त्यापासून तयार केलेले पदार्थ तरोटा कॉफी, मोहाचे लोणचे, आंबाडीचा पावडर इत्यादीचा समावेश होता. या महोस्तवात साधारण १० हजार रुपयांच्या भाज्यांची विक्री झाली. लोनावाही येथील लक्ष्मी, इंदिरा व निम्बुनी या ३ समूहांनी जिल्हास्तरीय रानभाजी महोस्तवात उत्कृष्ट सहभाग घेतला. यामध्ये तट्टूच्या शेंगा, तट्टूचे लोणचे, केना, केन्याचे वडे, इत्यादीची ६ हजार रुपयाची विक्री केली. गटविकास अधिकारी श्री इल्लुरकर यांनी सदर गटांच्या सहभागाबद्दल कौतुक केले. श्री. खेडकर तालुका कृषी अधिकारी यांचे विशेष सहकार्य लाभले. आयोजनासाठी श्री. नागरे, श्री. शामकुळे, श्री. मडावी, श्री. बोपचे, श्री. मल्लेवार, श्री. उईके, कु. उईके, श्री. दुपारे व श्री. मडावी यांनी सहकार्य केले.