सरस महोत्सवास मान्यवरांच्या भेटी

उमेद अभियान चंद्रपूर
0
चंद्रपुर (दिनांक 17): महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, चंद्रपुर यांचे संयुक्त विद्यमाने चांदा क्लब ग्राउंड चंद्रपुर येथे आयोजित सरस महोत्सवाला सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर भेट देऊन ग्रामीण महिलांचा उत्साह वाढवत आहे.

आज दिनांक 17 फेब्रुवारी रोजी ला दुपारी १.०० वाजता मा. आमदार सुभाषभाऊ धोटे यांनी भेट दिली. जिल्हास्तरीय सरस महोत्सवाच्या चवथ्या दिवशी जिल्हास्तरीय सरस महोत्सवामध्ये आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपुर यांचे वतीने ग्रामीण भागातून आलेल्या सर्व सहभागी महिलांची NCD अंतर्गत मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. आमदार सुभाषभाऊ धोटे राजुरा विधानसभा क्षेत्र यांनी केले. ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना बाजारपेठ निर्माण केल्या जाईल यासाठी शासन दरबारी पाठपुरावा केला जाईल. तालुकास्तरावर अशाच प्रकारचे प्रदर्शनीचे आयोजन करावे यावेळी उद्बोधन केले. या प्रसंगी श्री. डा. ओमप्रसाद रामावत संवर्ग विकास अधिकारी राजुरा उपस्थित होते.

दिनांक 16 फेब्रुवारी रोजी मा. आमदार श्री. किशोरभाऊ जोरगेवार चंद्रपुर विधानसभा क्षेत्र यांनी संपूर्ण स्टालला भेट देवून ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तूची पाहणी व खरेदी केली. तसेच सर्वांनी वस्तूची खरेदी करावी व ग्रामीण भागातील महिलांचा उत्साह वाढवावा असे मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे यांची उपस्थिती होती.

आज दुपारी 3.30 वाजता मा. श्री. देवराव भोंगळे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांनी स्टालला भेट देवून उर्वरित राहिलेल्या दोन दिवसात चंद्रपुर जिल्ह्यातील जनतेने सरस महोत्सवास भेट देवून वस्तूची जास्तीत जास्त प्रमाणे खरेदी करावी अशी विनंती केली.

मान्यवरांच्या भेटीदरम्यान श्री. निलेश काळे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपुर, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाचे राहुल ठाकरे, श्री. रामकृष्ण डाहुले (सहा. लेखा अधिकारी), श्री. गजानन ताजने, प्रवीण भांडारकर, गजानन भिमटे, श्री. प्रणव बक्षी ( स.प्र.अ.), पुंडलीक पाल ( विस्तार अधिकारी सांखिकी ) , श्री महेंद्र रामटेके (सहा. लेखा अधिकारी), रवी रघताटे, शिर्षल पोटदुखे, हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, मेघदिप ब्राम्हने तालुका व्यवस्थापक चिमुर, हर्षा उमरे, श्री कळसकर, अलका इनवते, महेंद्र बादूरकार, जयश्री कामडी, स्मिता आडे, मोहित नैताम, प्रवीण फुके इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos