१४ ते १८ फेब्रुवारी २०२० दरम्यान जिल्हास्तरीय सरस महोत्सव

उमेद अभियान चंद्रपूर
0

चंद्रपूर, : ग्रामविकास विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा आणि उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने महिला स्वयंसहायता समूहामार्फत उत्पादित वस्तू व कलाकृतीचे प्रदर्शन व विक्री करिता जिल्हास्तरीय सरस महोत्सव २०२० चे आयोजन दिनांक १४ ते १८ फेब्रुवारी २०२० या पाच दिवसीय कालावधीत चांदा क्लब, ग्राऊड, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले आहे.

जिल्हास्तरीय सरस महोत्सव २०२० या कार्यक्रमाचे उद्घाटन मा.ना श्री. विजयभाऊ वडेट्टीवार, मंत्री सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमीनी विकास, मदत व पुनर्वसन तथा पालकमंत्री करणार आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षास्थनी मा. सौ. संध्याताई गुरुनुले, अध्यक्ष जिल्हा परिषद, चंद्रपूर राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री.बाळूभाऊ धानोरकर, खासदार चंद्रपूर वणी- आर्णी लोकसभा क्षेत्र., मा. श्री. अशोक नेते खासदार, चिमूर- गडचिरोली लोकसभा क्षेत्र, मा.श्री. ना.गो.गाणार, विधान परिषद सदस्य, मा.श्री. अनिल सोले, विधान परिषद सदस्य, मा.श्री. डॉ. रामदास आंबटकर, विधान परिषद सदस्य, मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र, मा. श्री. सुभाष धोटे आमदार राजुरा विधानसभा क्षेत्र, मा.श्री.किर्तीकुमार भांगडिया आमदार चिमूर विधानसभा क्षेत्र, मा. श्री. किशोर जोरगेवार आमदार चंद्रपूर विधानसभा क्षेत्र, मा. सौ. प्रतिभाताई धानोरकर आमदार वरोरा विधानसभा क्षेत्र, मा. श्री. डॉ. कुणाल खेमणार (भा.प्र.से.) जिल्हा अधिकारी चंद्रपूर, मा. डॉ. महेश्वर रेड्डी (भा.पो.से.) जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. सौ. रेखा कारेकार उपाध्यक्ष जि.प. चंद्रपूर, मा. सौ. नितू वि. चौधरी सभापती महिला व बालकल्याण जि .प.चंद्रपूर, मा. श्री. नागराज गेडाम सभापती समाजकल्याण जि.प.चंद्रपूर, मा. श्री. राजू गायकवाड सभापती जि.प.चंद्रपूर, मा. श्री. सुनिल उरकुडे सभापती जि.प.चंद्रपूर उपस्थित राहणार आहेत.

सदर महोत्स्वामध्ये महिला स्वयंसहायता गटाची उत्पादने, विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थ विक्री करिता उपलब्ध असणार आहेत. तसेच दररोज सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १४ फेब्रुवारी २०२० ला सायंकाळी ७ वाजता सप्तखंजेरी वादक श्री. तुषार सूर्यवंशी, नागपूर यांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम, दिनांक १५ फेब्रुवारी २०२० ला सायंकाळी ६ वाजता शालेय मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम, दिनांक १६ फेब्रुवारी २०२० ला सायंकाळी ७ वाजता राहुल देशमुख आकांशा नगरकर यांचा अभिरुची मुझिकाल इव्हेंट, तर दिनांक १७ फेब्रुवारी २०२० ला सायंकाळी ७ वाजता‍अॅड मेघा राम धोटे यांचे मी सावित्री बोलते हा एकपात्री प्रयोग होणार आहे.

नागरिकांनी या प्रदर्शनाला उपस्थित राहावे असे आवाहन श्री. राहुल कर्डिले (भा.प्र.से.) मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद आणि श्री. निलेश काळे प्रकल्प संचालक यांनी केले आहे.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos