जिवती (लेखन - मनोज मेश्राम) : आयुष्याच्या एखादया वळणावर कुणीदरी मार्गदाता सापडतो आणि जीवनाला नवीन अर्थ गवसतो. नंदाताई मुसणे हिच्या आयुष्यात उमेदने असेच मार्गदीपाचे काम केले आणि नंदाताईचे आयुष्य सुखकर झाले. अवघ्या दोन वर्षात नैसर्गिक शेतीतून तिने उदरनिर्वाहाचे शाश्वत साधन शोधले आहे.
जिवती तालुक्यातील शेणगाव येथील नंदाताई आपल्या जीवनप्रवासाबददल सांगताना म्हणते, मी छोटयाशा खेडयात राहते. माझे लग्न वयाच्या सोळाव्या वर्षी झाले. खेळण्याच्या वयात संसाराची जबाबदारी आली. कसेबसे 7 वी पर्यत शिक्षण झाले होते. इतर महिलांप्रमाणे लग्न झाल्यानंतर स्वयंपाक करणे, कुटूंबांची सेवा सुरू झाली. घरगुती कामांत जीवन गुंतले. सारे काही निट सुरू असताना असताना माझ्या आयुष्यात दुख:चा डोंगर कोसळला. पतीचे अचानक निधन झाले त्यावेळी दोन मुले आणि परिवार होता. अगदी संसाराला सुरूवात होता होताच हा प्रसंग आल्याने आणि जगण्यासाठी इतर कुठलाही आधार नसल्याने काहीच सुचत नव्हते. त्यातल्या त्यात दोन मुले असल्याने मन विषण्ण व्हायचं. पण नाईलाज होता. मुलांसाठी जगणं आवश्यक होतं.
नंदाताइने जिदद सोडली नाही. घरात कमावते कोणी नसल्याने उदरनिर्वाहाचे साधन शोधण्यास प्राधान्य दिले. कसेबसे करुन मुलांना शाळेत टाकले. शिक्षणाचा आता तिला फायदा झाला. गावांतल्या गावांत शासकिय योजनाचे फार्म भरण्याचे विमा काढून देण्याचे काम सुरू केले. यातून थोडफार पैसे मिळू लागले. यातून तिच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. शासकिय कार्यालयांची तोंडओळख झाली.
यादरम्यान, 2016 ला उमेद अभियानाचे गावांत काम सुरू झाले. नंदाताईसाठी हा क्षण खूप महत्वाचा ठरला. अभियानाच्या कामात नंदाताईने स्वत: पुढाकार घेतला. नंदाताईचा पुढाकार बघून नंदाताईस महिलांनी समुदाय संसाधन व्यक्तीचे काम दिले. नंदाताईनेही गट तयार केला होताच. गावांत नवीन गट तयार करणे, खाती उघडणे आदी कामे ती करु लागली. ती गटाची अध्यक्षही झाली. यादरम्यान तिला अभियानाकडून विविध प्रकारची प्रशिक्षणे घेता आली. नंदाताईची गावांत ओळख निर्माण झाली. गावातील महिला गट तयार करण्यासाठी पुढे येवू लागल्या. नंदाताईच्या पुढाकारामुळे शेणगाव येथे 33 स्वयंसहायता समुहाची स्थापना झाली. प्रत्येक महिलेने कुठलाही तरी उदयोग करावा यासाठी ती बैठकीत मार्गदर्शन करु लागली.
शेणगाव येथे दोन ग्रामसघांची स्थापना झाली. अलिकडेच प्रभागसंघाची सुध्दा स्थापना केली. यादरम्यान महिला किसान सशक्तीकरण प्रकल्पाचे तालुक्यात काम सुरू झाले. थोडीफार शेती होती. मात्र, घरात कर्ता पुरूष नसल्याने शेती इतरांना कसायाला दिली जात होती. नंदाताईने विचार बदलला. स्वत:च शेती करण्याचा निर्धार केला. अभियानाच्या मार्गदर्शनामुळे सेंद्रीय शेती करण्याचे तिने ठरविले. उन्हाळयाच्या दिवसांत नांगरणी केली आणि 15 टॅक्टर शेणखत टाकले. नैसर्गिक पदधतीने शेती करण्यासाठी नंदाताई वेगवेगळे प्रयोग करत असताना गावांतून तिच्याकडे आश्चर्याने बघू लागले. काहींनी हेटाळणी सुदधा केली. मात्र, नंदाताईचा निर्धार पक्का होता. बीज प्रक्रिया करून कापूस, तूर व शेवगा लावण्याचा निर्णय घेतला.
मृग नक्षत्राच्या पहिल्या पावसात कापूस लावला. ती सर्व कामे स्वःता करत होती. निंदण करणे, सेंद्रिय खते देणे आदी कामे ती करायची शेती केवळ पुरूषच नव्हे, तर महिला करु शकते हे तिला दाखवून दयायचे होते. कापसाचे चांगले उत्पादन झाले. सोबत तूरही झाली. एव्हाना नैसर्गिक शेती किचकट असल्याचे मतही तिने खोडून काढले. तिला इतरापेक्षा चांगले उत्पादन झाले. त्यामुळे तिच्या आयुष्याला हातभार लागला. शेतीतून तिचा उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटला.