माझे नाव वनिता चिंतामण रामटेके आहे. मी प्रभागक्षेत्र मासळ: मदनापूर अंतर्गत वडसी येथे उमेद अभियाना अंतर्गत पशुसखी या पदावर कार्यरत आहे. माझ्या गावातील पशुपालक सविता सूर्यभान ठावरे यांच्या शेळयांना माझ्याकडे तयार केलेल्या निमतेलचा वापर शेळयांना झालेल्या मोहांडा या रोगावर करण्यात आला. त्यांनी सतत पाच दिवस आपल्या शेळयांना निमतेलचा वापर केल्यामुळे शेळयांच्या प्रकृतीत खूप फायदा दिसून आला व प्रकृती बारी झाल्यामुळे शेळ्या चारा खाऊ लागल्या. त्यामुळे पशुपालकाला खूप आनंद झाला. त्यांनी माझे आभार मानून संगितले की कमी खर्चात चांगला उपचार झाला व त्या उपचारामुळे रोगावर नियंत्रण मिळविता आले.
मी पशुसखी म्हणून उमेद या अभियानात कार्यरत असल्यामुळे हे शक्य झाले. पशूव्यवस्थापक यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनामुळे हे शक्य झाले. गावातील अन्य गटातील आणि गटाबाहेरील पशूपालक सुद्धा बकरीला होणार्या लहान रोगावर इलाज करण्यासाठी माझी मदत घेतात. मी हर्बल पद्धतीने इलाज करतो आणि मला गावातील आणि गावाजवळील लोक बकरीचे डॉक्टर म्हणून ओळखतात.
वनिता चिंतामण रामटेके
पशुसखी,
मु.-वडसी,
ता. चिमूर