राजुरा
: तालुक्यातील भेंडाळा येथे ०१/०३/२०१९
रोजी नवीन बहिणाबाई ग्रामसंघाची स्थापना करण्यात आली. यात उमेद अभियानात सहभागी
स्वयंसहायता समुहांनी मोठी हजेरी लावली.
भेंडाळा
येथे उमेदचे कार्य सुरू असून, अनेक गट स्थापन करण्यात आले आहे. सदर गाव देवाडा-डोंगरगाव
प्रभागात येते. या गटांना सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाल्याने गट ग्रामसंघ
स्थापनेसाठी पात्र ठरले होते. दिनांक १ मार्च २०१९ रोजी आयोजित कार्यक्रमात एकूण
१५ स्वयंसहायता समुहांनी सहभाग नोंदविला. या १५ समूहाची सर्वसाधारण सभा पार पडली.
यात स्थापना आणि कार्यपद्धती विषयक माहिती देण्यात आली होती. यावेळी अभियानाच्या
वतीने तालुका व्यवस्थापक श्री.नरेंद्र नगराळे , तालुका व्यवस्थापक
श्री. नोविद भडके, समूह संसाधन व्यक्ती सौ.सुरेखा जिवतोडे, स्वयंसहायता
गटाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.