सिंदेवाही : येथील पंचायत
समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात स्वयंसहायता समुहांनी सुरू केलेल्या सॅनिटरी
नॅपकीन विक्रीस प्रारंभ करण्यात आला.
ग्रामीण
भागातील किशोरी मुली व महिला यांचा आरोग्याचा प्रश्न विचारात घेता शासनांनी ८ मार्च
२०१८ पासून अस्मिता योजनेचा शुभारंभ केला. त्या अनुषंगाने तालुका अभियान
व्यवस्थापन कक्षाअंतर्गत ८ स्वयंसहाय्यता समूहांना गट विकास अधिकारी मा. इल्लुरकर
यांचे हस्ते महिला स्वयंसहायता गटांना सॅनीटरी नॅपकिन वितरित करण्यात आले. यावेळी मा. गटविकास अधिकारी यांनी मार्गदर्शन
केले. दशसुत्रीतील आरोग्याची काळजी या सूत्रानुसार किशोरी मुली व स्वत:च्या
आरोग्याची काळजी घ्यावी व त्याकरिता सॅनिटरी नॅपकीनचा वापर करण्याकरिता महिलांमध्ये
जागृती करावी. सोबतच प्रत्येक गटाने व्यवसायाची सुरवात करावी. ज्यामुळे महिला
आर्थिक दृष्ट्या सक्षम होतील, असे
श्री. इल्लूरकर म्हणाले.
यावेळी
आपले सेवा केंद्राचे तालुका समन्वयक प्रवीण गेडाम व
तालुका अभियान व्यवस्थापक उपस्थित होते.