राजुरा
: तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,राजुराच्या वतीने दुर्गम लक्कडकोट
या गावात रक्त तपासणी शिबिर घेण्यात आले.
डोंगरगाव प्रभागात येणाèया लक्कडकोट येथे
१६/०२/२०१९ रोजी हिमोग्लोबिन तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.
सदर
शिबिर कृतीसंगम उपक्रम अंतर्गत
घेण्यात आला. या अंतर्गत गावातील गर्भवती महिला, स्तनदा माता , किशोरवयीन
मुली आणि संपूर्ण गावातील इतर महिला यांच्या रक्तातील हिमोग्लोबिन तपासणी करण्यात
आली. यात देवाडा, लक्कडकोट हरदोना येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि सिकलसेल कन्सल्टन्ट
यांनी उपस्थित राहून आरोग्यविषयक मार्गदर्शन
व तपासणी केली.
या
शिबिराचा गावातील एकूण १२२ महिला तसेच
किशोर मुलींनी लाभ घेतला. या तपासणी शिबिरास प्रामुख्याने लक्कडकोट येथील ग्रामसेवक
पेरकीवार, मुख्याध्यपिका ढोक, ग्रामसंघातील पदाधिकारी उपस्थित होते.