नागभिड : पारडी-बाळापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील झेप
प्रभाग संघाची मासिक सभा दिनांक १८/१२/२०१८ रोजी पार पडली.झेप प्रभाग संघाच्या मासिक
आढावा सभेत ग्रामसंघ व प्रभागसंघ यांच्या उपसमितीची गरज व महत्व, कार्यपद्धती
संबंधी, सूक्ष्म गुंतवणूक निधी प्रभाग
संघाला परत करणे, उपजीविकेवर आधारित व्यवसाय, अवजार बँक या विषयावर मार्गदर्शन
करण्यात आले. यावेळी प्रभाग संघाचे अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष,
उपस्थित
होते. यावेळी जिल्हा परिषद सदस्य श्री. संजय गजपुरे यांनीही मार्गदर्शन केले. सभा मिंडाळा येथील समाज मंदिरात
पार पडली.
Post a Comment
0Comments