चंद्रपूर
: जिल्हा अभियान कक्षाच्या वतीने दिनांक ३ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे आयोजित महालक्ष्मी सरस
प्रदर्शनाला भेट देण्यात आली.
अभियानाच्या
वतीने दरवर्षी मुंबई येथे राज्यस्तरीय महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात
येते. या प्रदर्शनात देशभरातील स्वयंसहायता समुह सहभागी होतात. या वर्षीसुद्धा
जिल्ह्यातील दोन गटांनी यात सहभाग नोंदविला. दरम्यान जिल्ह्यातील ३० समुदाय संसाधन
व्यक्ती, क्षेत्र समन्वयक, तालुका व्यवस्थापक यांनी सदर प्रदर्शनास भेट
दिली. या भेटीत उमेद चमूने वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या गटांना भेटी दिल्या आणि
उत्पादनांची माहिती घेतली. या भेटीमुळे स्थानिक स्तरावर अनेक उत्पादन तयार करणे
शक्य असल्याचे मत सहभागी चमूने व्यक्त केले.
या
भेटीचे औचित्य साधून चमूने मुख्य कार्यकारी अधिकारी आर विमला यांची भेट घेतली.
दरम्यान प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान संचालक चंद्रकांत वाघमारे यांनीही
जिल्ह्यातील सहभागी गटांना भेटी देवून त्यांना प्रोत्साहन दिले. या दौèयाच्या
आयोजनासाठी जिल्हा अभियान व्यवस्थापक राहुल ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक
(विपणन) गजानन ताजने यांनी केले.