चंद्रपूर
: उमेद अभियान अंतर्गत दिनांक १६ ते २० फेब्रुवारी
२०१९ या कालावधीत प्रभागसंघ हिशोबनीसाचे ५ दिवसीय निवासी प्रशिक्षण आगरझरी येथे
पार पडले.
प्रशिक्षणात
प्रभागसंघ लिपिका, प्रभाग समन्वयक सहभागी झाले होते. जिल्हयातील सर्वच
तालुक्यातील प्रतिनिधींनी सहभारग नोंदविला. प्रशिक्षणात सर्वप्रथम प्रभागसंघातील लेखे यावर प्राथमिक माहिती देण्यात आले.
प्रभागसंघामध्ये किती लेखे असतात. प्रभागसंघामधील देवाणघेवाण, ते
कशाप्रकारे लिहावे याची माहिती देण्यात आली. प्रभागसंघ लिपीकेने करावयाची कामे,
प्रभागसंघ
लिपीकेची क्षमता, पात्रता, कर्तव्य आणि जबाबदारी यावरही मार्गदर्शन करण्यात आले.
प्रशिक्षणाच्या
दुसèया दिवशी प्रभागसंघाच्या बैठक अहवालाची माहिती देण्यात आली.
बैठक अहवाल कसा भरावा, याची माहिती देण्यात आली. तिसèया दिवशी पावती आणि
व्हाउचर तसेच कर्ज पुस्तक नोंदवही याविषयी माहिती देण्यात आली. प्रशिक्षणाच्या
चौथ्या दिवशी समूह सदस्यता नोंदवही, साठा नोंदवही, प्रवासखर्च, दैनिक
भत्ता नोंदवही कर्मचारी मानधन वाटप, वचननामा रोख नोंदवही याविषयी माहिती देण्यात
आली. पाचव्या दिवशी प्रभागसंघाचा मासिक अहवाल, प्रभागसंघ पासबुक या
लेख्याबाबत प्रशिक्षण देण्यात आले.
वारंगल
येथील प्रशिक्षकांनी मार्गदर्शन केले.