चंद्रपूर
: ग्रामविकासात महिला अत्यंत जबाबदारीची भूमिका वठवित आहे. उमेद अभियानामुळे आता
या महिला निर्णयप्रक्रियेत सहभागी होत आहे, असा विश्वास जिल्हा
परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कार्डिले यांनी व्यक्त केला. ते उमेद
अभियानाच्या वतीने महिला दिनी ८ मार्च २०१९ रोजी आयोजित पशूसखी कार्यशाळेत बोलत
होते.
पशूसखी
कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान
संचालक राहुल कार्डिले, जिल्हा अभियान सहसंचालक चंद्रकांत वाघमारे, आत्माचे
सहसंचालक रवींद्र मनोहरे, पशुसंवर्धन विभागाच्या डॉ. सुचिता धांडे, जिल्हा
अभियान व्यवस्थापक राहुल ठाकरे प्रामुख्याने उपस्थित होते.
पशूसखी
कार्यशाळेच्या प्रारंभी उपस्थित पशूसखी, समुदाय व्यवस्थापक यांनी पंतप्रधान यांनी
स्वयंसहायता गटांना केलेल्या दूरदर्शनवरील प्रक्षेपणाचा लाभ घेतला. या कार्यक्रमास
सुमारे २५० हून अधिक पशूसखी सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमाच्या उद्घाटनपर
कार्यक्रमात श्री. कार्डिले म्हणाले, लोकसहभागात प्रचंड ताकद असून, या
ताकदीचा वापर विकासासाठी होणे आवश्यक आहे. स्वयंसहायता गट, ग्रामसंघ विविध योजना
प्रभावीपणे राबविण्यासाठी उत्तम व्यासपीठ ठरत आहे. उमेदमुळे
महिलांत नव्या कल्पकतेला वाव मिळत असून, सर्वच शासकीय विभागांनी त्यांच्या योजना
प्रभावीपणे लोकांपर्यंत पोचविण्यासाठी या बाबीचा वापर केला पाहिजे. याप्रसंगी
जिल्हा अभियान सहसंचालक श्री. वाघमारे यांनीही मार्गदर्शन केले. उमेदमुळे ग्रामस्तरावर
प्रभावी यंत्रणा निर्माण झाली असून, आर्थिक उत्कर्षात महत्वाची भूमिका बजावत
असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी श्री. मनोहरे यांनी आत्मा विभागाच्या विविध
योजनांचा समुहांना कसा ङ्कायदा होऊ शकतो यांची माहिती दिली. डॉ. धांडे यांनीही
पशुपालन विषयक विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा अभियान व्यवस्थापक यांनी
कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट केला. संचालन जिल्हा व्यवस्थापक गजानन ताजने यांनी
केले.
आयोजनासाठी
जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकर, मुकेश मुंजनकर, तालुका व्यवस्थापक रवी
रघाताटे यांनी सहकार्य केले. या कार्यक्रमाला मोठया प्रमाणात पशूसखी व समुदाय पशू
व्यवस्थापक उपस्थित होते.