नागभिड
: उमेद अभियानाच्या नागभिड तालुका अभियान व्यवस्थापन कक्षा अंतर्गत सुरू असलेल्या
विविध उपक्रमांना धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या
वतीने भेटी देण्यात आल्या.
चंद्रपूर
येथील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या
उद्योगाच्या दायित्व निधी विभागांतर्गत १३/०२/२०१९ रोजी महिला स्वयंसहायता समुहांचा
अभ्यास दौर आयोजित करण्यात आला. तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष नागभीड अंतर्गत
सुरू असलेल्या विविध उपजिवीका आधारित उपक्रमांची पाहणी तसेच अभियानाची अमलबजावणी
गावस्तरावर कशी सुरू आहे, याविषयी सहभागी महिलांनी माहिती जाणून घेतली. यात qमडाळा
येथील भाजीपाला उत्पादक समूहातील महिलांनी केलेल्या शेतीची पाहणी करण्यात
आली. वासाळा मेंढा येथील राणी दुर्गावती मशरूम उत्पादक समूह यांच्या भेटीदरम्यान मशरूम उत्पादन कसे करायचे याचे प्रात्यक्षिक देण्यात आले. समूहाच्या
सुरू असलेल्या विविध व्यवसायाविषयी माहिती देण्यात आली. नवेगाव हुनडेश्वरी येथील ग्रामसंघाची परसबाग ,
लक्ष्मी
समूहातील सौ. कांताबाई यांनी अभियानाच्या मदतीने सुरू केलेल्या वैयक्तिक १०००
पक्ष्यांच्या कुक्कुटपालन युनिटला भेट देण्यात आली. त्यांनी अभियानामुळे त्यांच्या
जीवनात कसा सकारात्मक बदल झाला, हे सांगितले. कोसंबी गवळी येथील एकता ग्रामसंघाने समूहाच्या
मदतीने रोज गाव स्वच्छ कसे ठेवता येते, याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे
अभियानाच्या मदतीने समूहातील महिलांनी सुरू केलेले वैयक्तिक व्यवसाय, ग्रामसंघाची
स्वतःची आटाचक्की, ग्रामसंघाने ठेक्याने केलेली शेती व परस बाग, मोहाचे
त्याचप्रमाणे विविध प्रकारचे लोणचे, माश्यांपासून तयार करण्यात आलेले खाद्यपदार्थ
चकली, शेव बनवून दाखवण्यात आले. या अभ्यासदौèयामुळे
अनेक नवीन बाबी शिकता आल्या व याबाबी अनुकरणीय असल्याचे मत अधिका-èयांनी व्यक्त केले.
आयोजनासाठी
ग्रामसंघातील महिला, समुदाय संसाधन व्यक्ती, कृषीसखी, पशुसखी,
मत्स्यसखी,
कृषी -
पशू - मत्स्य व्यवस्थापक, तालुका अभियान कक्षातील अधिकारी, कर्मचारी, मींडाळा,वासाळा मेंढा,नवेगाव
हुंडेश्वरी, कोसंबी गवळी येथील समुहाच्या महिला यांचे सहकार्य लाभले.
अभ्यास दौरा यशस्वी होण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक मोहित नैताम यांनी विशेष सहकार्य केले.