चंद्रपूर : उमेद अभियानाच्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या
वतीने दिनांक ४ ते ७ डिसेंबर २०१८ दरम्यान कृतीसंगम सखी उजळणी प्रशिक्षण घेण्यात आले.
आरोग्य,
पोषण
आहार, स्वच्छता व शिक्षण
या विषयावर जागृती करून याचे महत्व स्वयंसहायता गटातील महिलांपर्यंत पोचविण्यासाठी
या प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. समुदाय संसाधन व्यक्तींची कौशल्य विकसित
व्हावी व त्यांना जबाबदारी व भूमिकेचे महत्व पटावे यावर प्रशिक्षणात भर देण्यात
आला.
दिनांक
४ ते ७ डिसेंबर २०१८ या कालावधीत कृतीसंगम सखी यांचे तीन दिवसीय
उजळणी प्रशिक्षण पार पडले. यात पहिल्या दिवशी तालुका अभियान व्यवस्थापक यांच्या
सोबत कृतीसंगम उपक्रमामध्ये मागील ४ महिन्यातील झालेल्या कामाचा
आढावा घेण्यात आला. तालुकानिहाय सुरू असलेले उपक्रमांची यावेळी माहिती जाणून
घेण्यात आली. दुसèया दिवशी राज्य प्रशिक्षक शरद पवार व सुधीर राजगडकर यांनी
कृतीसंगम उपक्रमाबाबत प्रथम उपस्थित
सखी यांच्याकडून उपक्रमाबाबत गटचर्चा करून सादरीकरण करून घेतले. त्यानंतर त्यांची
जबाबदारी व भूमिका याबाबत चर्चा केली.
प्रशिक्षणाच्या तिसèया दिवशी पुढील कालावधीतील नियोजन करून
घेण्यात आले .प्रशिक्षण तीन दिवस चालले. आयोजनासाठी जिल्हा व्यवस्थापक प्रवीण
भांडारकर यांनी सहकार्य केले.