जिवती :
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियान, तालुका अभियान
व्यवस्थापन कक्ष, जिवतीच्या वतीने चिखली खुर्द येथे कृतीसंगम कार्यक्रमातंर्गत आरोग्य विषयक शिबिर घेण्यात आले.
अभियानातंर्गत कृतीसंगम उपक्रम घेतले जातात. या अंतर्गत पोषण,आरोग्य या विषयावर
जनजागृती आणि प्रात्यक्षिके घेतली जातात. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून २०/०२/२०१९
चिखली खु येथे जिल्हा परिषद शाळेत आरोग्य विषयक शिबिर आयोजित करण्यात आले.
सेनगाव
पठाण प्रभागातील ग्रामपंचायत चिखली येथे कृतीसंगम कार्यक्रम अंतर्गत गावातील गर्भवती महिला,स्तनदा माता ,किशोरवयीन मुली मोफत
सॅनिटरी नॅपकिन वाटण्यात आले. ग्रामपंचायत अंतर्गत येणाèया सर्वर् गावातील महिलांकरिता
हे शिबिर घेण्यात आले. त्यात चिखली, तुमरिगुडा, नाईकनगर येथील
अंगणवाडी सेविका केंद्रातील कर्मचारी
यांनी उपस्थित राहून आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. या शिबिराचा गावातील एकूण ८२ महिला
तसेच किशोरवयीन मुलींनी लाभ घेतला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.शाळेच्या मुख्याध्यपिका,
अंगणवाडी
सेविका, ग्रामसंघाचे पदाधिकारी, आशावर्कर, समुदाय
संसाधन व्यक्ती, कृषिसखी, पशुसखी उपस्थित होत्या. आयोजनासाठी क्षेत्र समन्वयक
स्वप्नील राठोड यांनी सहकार्य केले.