चंद्रपूर
: जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान व कृषि
तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), चंद्रपूर यांचे संयुक्त विद्यमाने ११
जानेवारी २०१९ ते १५ जानेवारी २०१९ या कालावधीत आयोजित महिला स्वयंसहाय्यता समुहामाङ्र्कत
उत्पादीत वस्तुंचे प्रदर्शन आणि विक्री व कृषि महोत्सवात स्वयंसहायता समुहांनी
तब्बल २९ लाखांहून अधिक रकमेची उत्पादनाची विक्रमी विक्री केली.
येथील
चांदा क्लब ग्राऊंडवर स्वयंसहाय्यता समुहांकडून उत्पादीत वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध
होणाच्या दृष्टीने प्रदर्शन व विक्री महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण
भागातील महिलांच्या अंगी असलेल्या गुणकौशल्य प्रदर्शन व स्वत:मध्ये असलेला आत्मविश्वास
वाढविण्यासाठीचा हा महत्वपूर्ण उपक्रम आहे. यामुळे महिलांमध्ये
संबंधीत व्यवसायीक कलागुणांना वाव मिळते व कौशल्य वृध्दिंगत होते.
प्रदर्शनीमध्ये
जिल्हयातील एकूण ८४ महिला स्वयंसहायता समुह सहभागी झाले होते. विक्री व
प्रदर्शनीचे उदघाटन दि. ११ जानेवारी २०१९ रोजी राज्याचे अर्थमंत्री तथा पालकमंत्री
सुधीर मुनगंटीवार यांनी केले, तर कार्यक्रमाचा समारोप केंद्रीय गृहराज्यमंत्री ना. हंसराज
अहीर यांनी केला. प्रदर्शनीमध्ये सहभागी गटांच्या माध्यमातून विविध गृहपयोगी
उत्पादने विक्रीस उपलब्ध होती. यामध्ये लोणचे, विविध प्रकारच्या
चटण्या, कडधान्य, मसाल्याचे पदार्थ, खाद्यपदार्थ, लांबपोळी, पुरणपोळी,
झुनका
भाकर, मोहाची भाकर, जवस चटण्या, मातीचे भांडे, लोकरी
वस्तू, लाकडी शिल्प, शोभीवंत वस्तू, हातसळीचे तांदूळ,
कापडी
बॅग, मशरुम, टेराकोटा, गांडूळखत, गोमुत्र अर्क आदीचा समावेश होता. या सोबतच पुरणपोळी,
शाहाकारी
तसेच मांसाहारी जेवण, झुणका भाकर, लांब पोळया आदींचा चंद्रपुरकरांनी आस्वाद घेतला. रोज
सायंकाळी मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जायचे.