पोंभुर्णा
: तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने वित्तीय साक्षरता अभियान अंतर्गत मोहाळा
ग्रामसंघ विशेष जागृती कार्यक्रम घेण्यात आला.
आर्थिक
व्यवहार, बँकेतील व्यवहार विषयक साक्षरता निर्माण करण्याचा उद्देश
ठेवून दिनांक २५ जानेवारी रोजी उमेद ग्रामसंघ मोहाळा येथे रिझव्र्ह बँकेच्या
माध्यमातून वित्तीय साक्षरता, बँक खात्याचे विविध प्रकार, बँकेतून मिळणारे विविध
कर्ज, विविध प्रकारचे विमे,तसेच विविध नोटा कशा
ओळखायच्या याबाबत माहिती दिली. एकुण ६०
व्यक्ती सहभागी झाले होते. यावेळी चेपूरवार सर, ठाकरे सर, मा.मुंजनकर
सर, शेंडे सर, पवार सर यांची उपस्थिती होती.