भद्रावतीः
चंदनखेडा गाव म्हणजे भद्रावती तालुक्यातील सांसद आदर्श गाव. वेगवेगळ्या शासकीय योजनांचा या गावाला
प्राधान्यक्रम दिला जात असताना उमेद अभियानाने गावांत
बजावलेली भूमिका महत्वाची आहे.
महाराष्ट्र
राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान महीलांच्या आर्थिक व सामाजिक विकासासाठी कार्यरत
आहे. गरिबीतून बाहेर काढतानाच केवळ आर्थिक प्रगतीपुरतेच मर्यादीत न ठेवता महिलांना
सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी अभियान प्रयत्नशील आहे.
चंदनखेडयात
६५८ कुटूंबसंख्या आहे. या कुटुंबातील ५९२ महिला उमेद अभियानात सहभागी आहेत. ५३
स्वयंसहायता समूह गावात आहेत. त्यापैकी ४९ समुहांना खेळते भांडवल प्राप्त झाले
आहे. एकूण ७३५००० रुपये समुहांना मिळाले आहेत. हे भांडवल आर्थिक विकासासाठी पुरेसे
नाही. पण एक नवी दिशा देण्यासाठी या रकमेने महिलांमध्ये आत्मविश्वास जागविला. या मदतीतुन
महिलांनी लघूउदयोगाची कास धरली. ४६ महिला लघुउद्योग स्थापन करण्यास तयार होताच
त्यांना सामूदायिक गुंतवणूक निधी पुरविण्याची व्यवस्था अभियानाने केली. ५३ पैकी १५
समुहांना प्रत्येकी ६० हजार रुपये निधी देण्यात आला. तब्बल ९ लाख रुपये गावात
पोहचले.व यामुळे ४६ महिलांच्या आर्थिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त झाला. या रकमेला बँक
अर्थसहाय्याची जोड मिळाली. ९ समुहांना बँकेतून ७६००००/- रुपये मिळाले. मुद्रा
कर्जाच्या माध्यमातून १७ महिलांना मदतीचा हात मिळाला आहे. गावातील वैष्णवी महीला गटाला जिल्हा मध्यर्वती सहकारी बँकेने
५ लाखांचे कर्ज मंजूर केले आहे. या सोबतच
तेजस्वी समूहाने दालमिलचा व्यवसाय सुरू केला आहे. अभियानाच्या मार्गदर्शनातून
सध्या ४६ महिला वेगवेगळ्या उद्योगात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष जुळलेल्या आहेत. कृती
संगम योजनेतून पशुसंवर्धन विभागाने ४ कुटुंबांना
दुग्धव्यवसायासाठी १२ गायी वितरित केल्या. दुग्धव्यवसाय महिलांचा आधार बनत आहे.
गावात २ ग्रामसंघ तयार झाले असून, त्यात ३३ स्वयंसहायता गट जुळले आहेत. गामसंघाच्या माध्यमातून
महीलांमध्ये नवा विश्वास निर्माण होत आहे. गावातील या महीलांच्या विकासाला निरंतर
नवी दिशा मिळावी म्हणून दोन संसाधन समूदाय व्यक्ती कार्यरत आहे. कृषीविषयक मार्गदर्शनातून
शेतीला नवा आयाम देण्यासाठी कृषीसखी कार्यरत आहेत. आर्थिक
साक्षरता व समावेशन या उपक्रमासाठी उपक्रम असून
त्यासाठी चंदनखेडयात १ आर्थिक समावेशन सखी तसेच २ बँक सखी अभियानाने नियुक्त
केल्या आहेत.
शाश्वत
उपजीविका हा अभियानाचा मूख्य उद्देश असून चंदनखेडयात त्या दिशेने वाटचाल सुरू झाली
आहे. ४६ महीला विविध उद्योगातून आपली उन्नती करित असतानाच आणखी २५१ महीला बँक कर्ज
व सामूदायीक गुंतवणूक निधीचा वापर करून उपजीविका सक्षम करीत
आहे. गावातील तरुणांना रोजगारासाठी मार्गदर्शन करण्याकरिता पंडित दीनदयाल उपाध्याय
ग्रामीण कौशल्य योजनेतून २ शिबिर आयोजीत करण्यात आले. त्या मधून १२ मूलांनी
वेगवेगळ्या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. तर आरसेटी अंर्तगत महिलांना दुग्ध व्यवसायाचे
प्रशिक्षण देण्यात आले. सांसद आदर्श गाव
म्हणून महाराष्ट्र राज्य ग्रामिण जीवनोन्नती अभियानाने महिलांना विकासाच्या मूख्य
प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
(संकलन -तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, भद्रावती)