प्रगती शेळी उत्पादक गटाची प्रगतीकडे वाटचाल

उमेद अभियान चंद्रपूर
0

नागभिड  : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महिलांची, समूहाची व उत्पादक गटाची शाश्वत उपजीविका निर्मिती करण्याच्या निमीत्ताने शासनामार्फत नवनवीन कार्यक्रम राबविण्यात येत असून याचाच एक भाग म्हणून नागभीड तालुक्यात तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती,नागभीड अंतर्गत गावागावात उत्पादक गट तयार करण्यात आलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे प्रगती शेळी उत्पादक गट चिकमारा.

दिनांक 25/04/2023 रोज मंगळवारला प्रगती शेळी उत्पादक गट, चिकमारा च्या सौजन्याने बकरा मटन शॉप चे उद्घाटन सायंकाळी ठीक 04.00 वाजता बाजार चौक,चिकमारा येथे करण्यात आले. या उत्पादक गटाच्या माध्यमाने चिकमारा तसेच आजूबाजूच्या गावातील खवय्यांना ताजे मटण उपलब्ध होणार आहे. उद्घाटना दरम्यान मा.कु.सोनाली चंदनखेडे,सरपंच, ग्रामपंचायत,चिकमारा प्रमुख पाहुणे मा.सौ.सुनंदा धर्मदास घोटेकर,अध्यक्ष,सहेली महिला ग्रामसंघ,चिकमारा,मा.श्री.अमोलजी मोडक,तालुका व्यवस्थापक,तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष,पंचायत समिती,नागभीड, मा.कु.ज्योतीताई साळवे, प्रभाग समन्वयक, मा.सौ.शालूताई खोब्रागडे व मा.श्री.जगदीशजी हजारे, समुदाय पशु व्यवस्थापक,मा.सौ.स्नेहा नितीन वारजुकर, समुदाय कृषी व्यवस्थापक उपस्थित होते. कार्यक्रमाकरिता समूह संसाधन व्यक्ती, पशु सखी, उत्पादक गटातील सदस्य आणि सहेली महिला ग्रामसंघाचे पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos