कु.देवता सुर्यवंशी,वर्धिनी,जनकापूर व प्रास्ताविक मा.श्री.राहुलजी रामटेके यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन सौ.प्रविना रामटेके,आरोग्य व पोषण सखी यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता श्री.गजानन गोहणे,श्री.दिपक गायकवाड,श्री.नंदकीशोर डहारे,श्री.इंद्रजीत टेकाम,श्री.किशोर मेश्राम,सौ.मालु रामटेके,सौ.दर्शना गुरनुले,प्रभागातील सर्व कृषी सखी,पशु सखी व समूह संसाधन व्यक्ती, गावातील सर्व कॅडर, ग्रामसंघ पदाधिकारी व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी मेहनत घेतली.
जनकापूर येथे आठवडी बाजारास सुरूवात
March 14, 2022
0
नागभिड : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती नागभीड यांच्या मार्गदर्शनातून आधार महिला ग्रामसंघ, जनकापूर,तळोधी-गोविंदपूर प्रभाग व ग्रामपंचायत जनकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 मार्च 2022 रोज शुक्रवारला आठवडी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे वेळी गावातील 12 स्वयंसहायता समूहातील महिला व गावातील नागरिक उपस्थित होते. या आठवडी बाजाराच्या माध्यमातून उत्पादक, विक्रेते व ग्राहक यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.आठवडी बाजार सुरू करण्यामागचा उद्देश गावातील उत्पादीत मालाची गावात विक्री करता यावी, गावकऱ्यांचे वेळ व श्रम कमी व्हावे तसेच दळणवळणाचा खर्च कमी व्हावा हा आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.श्री.महेशजी रामटेके, उपसरपंच, ग्रा.पं.जनकापूर, उद्घाटक मा.श्री.संजुभाऊ गजपूरे,जि.प.सदस्य,पारडी-बाळापूर प्रभाग, प्रमुख पाहुणे मा.सौ.रंजनाताई पेंदाम,सदस्य,पं.स.नागभीड, मा.सौ.वैशालीताई गायधने,सरपंच,ग्रा.पं.,जनकापूर, मा.सौ.शारदाताई सुर्यवंशी,मा.सौ.शुभांगीताई डहारे, ग्रा.पं.सदस्य,मा.श्री.मोहीतजी नैताम,तालुका अभियान व्यवस्थापक,पं.स.,नागभीड,मा.श्री.अमोल मोडक,तालुका व्यवस्थापक,पं.स.,नागभीड,मा.सौ.सविताताई गेडाम,कोषाध्यक्ष,भरारी प्रभाग संघ,तळोधी-गोविंदपूर प्रभाग, मा.श्री.राहुलजी रामटेके, पत्रकार लोकमत वृत्तपत्र,नागभीड,मा.सौ.शुभांगीताई सुर्यवंशी,अध्यक्ष,आधार ग्रामसंघ,जनकापूर,मा.सौ.सुरेखाताई काशिवार,सचिव,आधार ग्रामसंघ,जनकापूर,मा.श्री.वासेकर सर,ग्रामसे़वक,ग्रा.पं.जनकापूर,मा.सौ.सत्यवती रामटेके,प्रेरीका,माविम,मा.कु. ज्योती साळवे व मा.श्री.शुभम देशमुख,प्रभाग समन्वयक,उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सौ