उमेद अभियान अंतर्गत ‘आजादी का अमृत महोत्सव’
January 10, 2022
0
कोठारी:महिला ग्रामसंघ कोठारी तर्फे महिला सक्षमीकरीता उमेद अभियान अंतर्गत ‘आजादी का अमृत महोत्सव’ दि. ०७/०१/२०२२ रोज शुक्रवार रोजी ‘ म. फुले – डॉ. आंबेडकर सांस्कृतिक सभागृह कोठारी ‘ येथे पार पडला.माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा. मोरेश्वर लोहे (सरपंच – ग्राम पंचायत कोठारी), प्रमुख अतिथी – मा. सोमेश्वर पद्मगिरीवार ( उपसभापती – पंचायत समिती बल्लारपूर), इतर मान्यवर – मा. अभय धवने (ग्रामसेवक – ग्रा. पं. कोठारी), सौ. स्नेहल टिंबडीया ( सदस्या – ग्रा. पं. कोठारी), सौ. विद्या देवाळकर ( सदस्या – ग्रा. पं. कोठारी), सौ. शीला वासमवार ( सदस्या – ग्रा. पं. कोठारी), सौ. विना तोरे ( सदस्या – ग्रा. पं. कोठारी), सौ. विमल खोब्रागडे ( सदस्या – ग्रा. पं. कोठारी), सौ. कल्पना वडघने ( सदस्या – ग्रा. पं. कोठारी), श्री. अमोल कातकर ( सदस्य – ग्रा. पं. कोठारी), श्री. युवराज तोडे ( सदस्य – ग्रा. पं. कोठारी), सौ. संतोषी उमक ( तालुका व्यवस्थापक – उमेद अभियान, पं. स. बल्लारपूर ), सौ. भावना भगत ( बी. एम. आय. बी. सी. बी.- उमेद अभियान, पं. स. बल्लारपूर), सौ. सुकेशनी गणवीर ( सी. सी. – उमेद अभियान, पं. स. बल्लारपूर), श्री. प्रशांत भडके ( सी. एफ. एम. – उमेद अभियान, पं. स. बल्लारपूर), सौ. छायाताई काकडे ( बँक व्यवस्थापक – सी. डी. सी. सी. बँक कोठारी) इ. मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा, देशभक्ती गीत लेखन स्पर्धा, अंगाई गीत स्पर्धा इ. स्पर्धा घेण्यात आल्या. रांगोळी स्पर्धेत प्रथम पारितोषिक सौ. प्रियांकाताई हिवरे, द्वितीय पारितोषिक सौ. प्रियांकाताई तोडे, तृतीय पारितोषिक सौ. शारदा ईजगिरवार यांनी, देशभक्ती गीत स्पर्धेत प्रथम पारितोषिक सौ. बाबिताताई कोवे, द्वितीय पारितोषिक शितलताई राजूरकर, तृतीय पारितोषिक सौ. उमाताई परसुटकर, प्रोत्साहनपर बक्षीस सौ. यास्मिनी चंदनखेडे यांनी तर अंगाई गीत स्पर्धेत प्रथम पारितोषिक सौ. निशाताई पेटकर, द्वितीय पारितोषिक सौ. पुष्पाताई गोंधळी, तृतीय पारितोषिक सौ. संगीताताई कोसरे, प्रोत्साहन पर बक्षीस सौ. सपनाताई विरुटकर यांनी पटकावले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सी.आर. पी. सदस्या, ग्रामसंघ पदाधिकारी, इतर कॅडर सदस्या महिलांनी अथक प्रयत्न केले