बल्लारपूर येथे सेंद्रिय निविष्ठा व शेतमाल विक्री केंद्र

उमेद अभियान चंद्रपूर
0

बल्लारपूर  : आज दि .18/01/2022 ला तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष बल्लारपूर  च्या वतीने " *सहारा सेंद्रिय उत्पादक गट बामणी च्या माध्यमातून सेंद्रिय शेती गटात असलेल्या महिलांमार्फत " सेंद्रिय निविष्ठा व शेतमाल विक्री केंद्र सुरू करण्यात आले असून सदर  ऑर्गनिक outlet  चे उदघाटन  पंचायत समिती उपसभापती श्री.सोमेश्वर भाऊ पदमगिरीवार व सरपंच ताजने साहेब यांचे हस्ते करण्यात आले असून जिल्हा अभियान व्यवस्थापक मा. श्री.वाळके साहेब यांची विशेष उपस्थिती लाभली .  सदर सेंद्रिय निविष्ठा  व शेतमाल विक्री  केंद्रामुळे तालुक्यात सेंद्रिय शेती ला विशेष चालना मिडेल अशे मत उदघाटक पर भाषणात श्री.उपसभापती साहेब यांनी मांडले तर सेंद्रिय शेतीचा इतिहास व आज ची आवश्यकता या विषयावर DMM सर यांनी प्रकाश टाकला तर सरपंच साहेब यांनी सदर उपक्रम हे स्तुत्य असून आपले  ग्रामपंचायती मार्फत नेहमी सहकार्य असेल त्या बाबत ची ग्वाही दिली.श्री.साखरे सर (DM ) यांनी सुध्दा योग्य ते मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमाला तालुका अभियान कक्षातील सर्व कर्मचारी   व  lg, pg ग्रुप च्या महिला , कृषी पशु सखी  उपस्थित होत्या कार्यक्रमाचे संचालन पंकज गणवीर (CC Of)  व आभार प्रदर्शन माऊलीकर सर (CC ) यांनी केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos