प्रमुख मार्गदर्शक- मा. मोकासे सर यांनी विपणन विषयावर सविस्तर माहिती दिले. उद्योग कसा करावा, उद्योग निवड कशी करावी, प्रॉडक्ट ची ब्रँडिंग , लेबलिंग , पॅकेजिंग, या विषयावर मार्गदर्शन केले. बाजारपेठेत आपली वस्तू कशी आणावी , नवनवीन उद्योग कसे उभारावे, व्यवसाय करतांना येणाऱ्या अडचणी, व त्या अडचणींवर मात कसे करावे, अभियानाच्या माध्यमातून सामूहिक व वैयक्तिक व्यवसाय कसा करावा, लहान उद्योग बाजारपेठेत कसा टिकवावा व त्याला मोठा कसा करावा इत्यादि विषयावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या शेवटी प्रशिक्षणार्थी सोबत प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून चर्चा करून अनेक प्रश्नाचे निरासरण करण्यात आले. सदर कार्यशाळेचे संचालन श्री. पंकज गोटपर्तीवार , प्रास्ताविक श्री मेश्राम सर ( bmm) आभार सौ. गीतांजली ताई यांनी केले.
जिवती येथे विपणन कार्यशाळा
January 19, 2022
0
जिवती : आज दिनांक -19/01/2022 रोज बुधवार ला तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष पंचायत समिती सभागृह जिवती येथे विपणन विषयावर एक दिवसीय जिल्हा स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेला मा. पेंदाम सर (गट विकास अधिकारी ) , मा. मोकासे सर ( प्रमुख मार्गदर्शक ) , मा. मेश्राम सर (BMM) , चालखुरे सर ( BM-MIS) , आहेर सर (ORG) , वाढई सर (CC-ORG) , पंकज सर ( FL) उपस्थित होते.