उद्योजक घडविण्यासाठी “विपणन “ विषयावर कार्यशाळा

उमेद अभियान चंद्रपूर
0

चंद्रपूर :  दिनांक 30/12/2021 रोजी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर च्या माध्यमातून  कृषक भवन पंचायत समिती चंद्रपूर येथे "विपणन" या विषयावर जिल्हा स्तरावरून एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आलेले होते.

    सदर कार्यशाळा मार्गदर्शक म्हणून मा.श्री मोकासे सर लाभले होते त्यांनी उपस्थित महिलांना उद्योग, बाजारपेठ,नवनवीन संधी, अडचणी या बाबत सविस्तर माहिती दिली तसेच उपस्थित महिला च्या व्यवसायाबाबत अडचणी जाणून घेत उपाय सांगितले तसेच उमेद अभियानाच्या माध्यमातून गट,ग्रामसंघ, प्रभाग संघामार्फत काय काय व्यवसाय करता येणार व छोटा व्यवसाय सुरु असेल त्याला कश्या प्रकारे मोठ्या प्रमाणत बाजारपेठेत आणता येणार तसेच कसा प्रकारे जास्तीत जास्त महिलांना रोजगार देता येणार व यशस्वी उद्योजक बनता येणार याबाबत मार्गदर्शन केले. 

    जिल्हा अभियान व्यवस्थापक  कक्षातील मा.श्री वाकडे सर,  जिल्हा अभियान व्यवस्थापक यांनी उपस्थित महिलांना उद्योगाबाबत मार्गदर्शन केले.तसेच मा.श्री ताजने सर, जिल्हा व्यवस्थापक विपणन यांनी समूहांनी केलेल्या उद्योगाची  प्रचार व प्रसिद्धी कश्या प्रकारे करायचे याबाबत मार्गदर्शन केले.सदर कार्यक्रमा ला पंचायत समिती चंद्रपूर च्या श्रीमती कळमकर मॅडम उपस्थित होत्या. सदर कार्यशाळे ला तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर च्या  शितल देरकर तालुका अभियान व्यवस्थापक, प्रतीक्षा  खोब्रागडे तालुका व्यवस्थापक आर्थिक समावेशन , जयश्री नागदेवते तालुका व्यवस्थापक संस्था बांधणी व क्षमता बांधणी,  प्रवीण फुके प्रभाग समन्वयक, सिद्धार्थ ढोणे प्रभाग समन्वयक, भारत कळसकर प्रभाग समन्वयक विविध व्यवसाय करणाऱ्या उमेद च्या  होतकरू महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos