चंद्रपूर : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, चंद्रपूरच्या वतीने दिनाक 22 ते 25 डिसेंबर 2021 या कालावधीत पंचायत समिती आवारात थेट शेतातील ताजा भाजीपाला विक्रिचा उपक्रम राबविण्यात आला. प्रथमच राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला तिन्ही दिवस मोठा प्रतिसाद मिळाला.
तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या भाजीपाला विक्री उपक्रमाचे उदघाटन पंचायत समितीच्या सभापती केमा रायपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपसभापती विकास जुमनाके, गटविकास अधिकारी श्री. हटवार सर, जिल्हा व्यवस्थापक गजानन ताजने , रोशन साखरे, नरेंद्र नगराळे,तालुका अभियान व्यवस्थापक शितल देरकर उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिलांना विविध वस्तूंच्या संधी उपलब्ध व्हाव्या, त्यांना बाजारज्ञान मिळावे या उददेशाने आयोजित या उपक्रमांस जिल्हाधिकारी कार्यालय, पंचायत समिती कार्यालयातील अधिकारी तसेच कर्मचारी वर्गांनी मोठा प्रतिसाद दिला. उपक्रमा दरम्यान पंचायत समिती परिसरात विविध प्रकारचा भाजीपाला ज्यात हरभरा भाजी, बटवाची भाजी, मोहोरी भाजी, मुळ्याची पाने, मेथी, पालक, तुरीच्या शेंगा, मुळा, चियुरची भाजी, राजगिराची भाजी, हिरवा पातीचा कांदा इत्यादीचा समावेश होता. उपक्रमादरम्यान विविध प्रकारचे हिरव्या पालेभाज्यांचे पदार्थही विक्रीस ठेवण्यात आले होते. तिन दिवशीय उपक्रमास वेगवेगळया मान्यवरांनी भेटी देवून महिलांचा उत्साह वाढविला. यात जिल्हा अभियान व्यवस्थापक मनोहर वाकडे, जिल्हा व्यवस्थापक प्रवीण भांडारकर, संदीप घोंगे, यांचा समावेश होता.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी तालुका व्यवस्थापक प्रतिक्षा खोब्रागडे, जयश्री नागदेवते, श्री. फुके, श्री. ढोणे, श्री. कळसकर, श्री महेंद्र बंदुरकर, सोनम जांभुळकर, यांचेसह कृषीसखी यांनी सहकार्य केले.