वरोरा येथे उमेद दिवाळी फराळ व उत्पादने विक्री प्रदर्शन

उमेद अभियान चंद्रपूर
0

वरोरा :
ग्रामीण भागातील महिला स्वयं सहाय्यता समुहांनी तयार केलेल्या   खाद्य पदार्थ व उत्पादनास बाजार  उपलब्ध व्हावा यासाठी उमेद - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पं. स. वरोरा यांचे वतीने दिनाक २९ / १०/२०२१ रोजी पंचायत समिती परिसरात विक्री स्टॉल लावण्यात आले. या विक्री स्टॉल चे उद्घाटन पंचायत समिती सभापती रवींद्र धोपटे यांचे हस्ते करण्यात आले.त्यावेळी प्रामुख्याने उपसभापती संजीवनी भोयर, गट विकास अधिकारी राजेश राठोड, सहाय्यक गट विकास अधिकारी संजय वानखेडे,पंचायत समिती सदस्य पार्वती ढोक, तालुका अभियान व्यवस्थापक अरुण चौधरी, विस्तार अधिकारी चव्हाण उपस्थित होते. तालुक्यात अभियानातंर्गत स्वयं सहाय्यता समूहातील होतकरु महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा व  स्वयंसहाय्यता समूहांनी दिवाळी सनानिमित्य बनविलेल्या वस्तूंची मोठ्या प्रमाणात विक्री व्हावी यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली शेटी यांचे मार्गदर्शनात सदर विक्री स्टॉल लावण्यात आले. यामध्ये तालुक्यातील ४२ समुहानी तयार  केलेले विविध फराळाचे पदार्थ, दिवे, भेट वस्तू , इतर उत्पादने लावण्यात आली. या विक्री स्टॉलला पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी , ग्राम सेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविका , इतर कर्मचारी , शहरातील नागरिक,  प्रभाग संघ, ग्राम संघ प्रतिनिधी,सी आर पी , कृषी सखी,पशु सखी,बँक सखी इत्यादींनी भेट देऊन वस्तू , उत्पादने खरेदी केली. विशेष म्हणजे यानिमित्ताने तालुक्यातील प्रभाग संघामार्फत प्रथमतः एकत्रित रांगोळी आणि दिवे खरेदी करून ग्रामीण कुटुंबाची बचत आणि ग्राम संघाला नफा सुद्धा प्राप्त झालेला आहे. तालुक्यातील तळेगाव येथील प्रशांत समूहाकडून जिल्ह्यात मातीच्या दिवाच्या पुरवठा केलेला आहे. यावेळी प्रभाग संघ मार्फत अनेक ग्राम संघांनी एकत्रित दिवे आणि रांगोळी, किराणा खरेदी करून महिलांची बचत केली. विक्री प्रदर्शनी साठी तालुक्यातील अनेक अधिकारी व कर्मचारी, सरपंच, उपसरपंच , सदस्य , ग्रामस्थ यांनी भेट देऊन वस्तू देखील खरेदी केल्या. त्यामुळे महिलांना समूहांना आर्थिक नफा सुद्धा झाला आणि त्यांचा विक्री विषयक आत्म विश्वास वाढीस लागला.

         उपक्रम यशस्वितेसाठी  तालुका व्यवस्थापक प्रशांत काकडे, प्रभाग समन्वयक गजानन देशत्ती वार, हर्षा नागतुरे,  कुणाल ता डू र वार, साई किरण धोटे, सचिन राजूरकर इत्यादींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos