चंद्रपूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत तालुका अभियान व्यवस्तापन कक्ष चंद्रपूर च्या माध्यमातून समुहातर्गत लघु उद्योगांना चालना मिळावी विक्रीसाठी नवीन दालन या उद्देशाने पंचायत समिती परिसरात दिवाळी निमित्य दि, 29/10/2021 रोजी दिवाळी फराळ, इको फ्रेंडली आकाश कंदील, दिवे, रांगोळी व इतर अनेक वस्तू ची प्रदर्शनी व विक्री चे उद्घाटन पं. स. च्या सभापती मा. केमाताई रायपुरे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी श्री. जुमनाके, उपसभापती, श्री. शामराव चंद्रकांत धोडरे, श्री. संजय यादव, सौ. वंदना पिंपळशेंडे, सौ. सरिता कोवे, सिंधू लोनबले, संगीता उपरे, श्री. आशुतोष सपकाळ, गविअ, गजानन ताजने, जिल्हा व्यवस्थापक, सौ. शितल देरकर, यांची उपस्थिती होती.
कु, प्रतीक्षा खोब्रागडे, कु. जयश्री नागदेवते, श्री. चवरे, ढोणे, फुके, कलसकर, भोपे, कु. जांभुलकर, यांनी सदर कार्यक्रमाकरिता सहकार्य केले.
तालुक्यातील अनेक बचत गटांनी यावेळी आपल्या उत्पादनाचे स्टॉल लावले यात प्रामुख्याने पारिजात महिला बचत गट दाताळा, महिला बचत गट दुर्गापूर, चिंचाला येथील सौ. संगीता ठेंगणे, सीमा विरुटकर, प्रेरणा एडणुरवार , इंदिरा बुरबांदे, पिंकी सेलोकर व इतर महिला सहभागी झाल्या होत्या.