सदर सोहळ्यास संवर्ग विकास अधिकारी, तालुका अभियान व्यवस्थापक, जिल्हा अभियान व्यवस्थापक उपस्थित होते. सेंद्रीय शेती काळाची गरज कशी आहे, यावर मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष गजानन ताजने यांनी उत्पादन आणि उत्पन्न, या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे मा.भांडारकर सर यांनी अभियानातील दशसूत्रे यावर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक प्रकाश रामटेके यांनी केले. यावेळी तिन्ही प्रभागसंघ अध्यक्ष उपस्थित होते. तालुका अभियान तालुक्यातील सर्व अधिकारी कर्मचारी, CAM, CLM, CFM, CTC उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वी होण्याकरिता हिंगाणे सर, अरुणाताई, विणा ताई यांनी अथक परिश्रम केले.