महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मुल व वृंदावन प्रभासंघ डोंगरगाव यांचे वतीने पंचायत समिती कार्यालय मुल येथे अन्नपूर्णा उपहारगृहाचे उद्घाटन करण्यात आले.
टन माजी अर्थमंत्री तथा सुधीर भाऊ मुनगंटीवार यांचे उपस्थितीत करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. संध्याताई गुरनूले अध्यक्षा जिल्हा परिषद चंद्रपूर, मा. चंदूभाऊ मारगोनवार सभापती पंचायत समिती मुल, मा. सौ. जयश्रीताई वलकेवार उपसभापती पंचायत समिती मुल, मा. पूजाताई डोहने पंचायत समिती सदस्य मुल, मा. डॉ. मयूर कळसे संवर्ग विकास अधिकारी पंचायत समिती मुल मा.श्री. गजानन ताजने सर, जिल्हा अभियान व्यवस्थापक जि. अ. व्य. कक्ष चंद्रपूर, रोशन साखरे सर, जिल्हा व्यवस्थापक जि. अ. व्य. कक्ष चंद्रपूर, राजेश दुधे सर, तालुका अभियान व्यवस्थापक ता. अ. व्य. कक्ष पोभूर्णा, सौ. आरिफा भसारकर, वृंदावन प्रभाग संघ अध्यक्ष, सुवर्णा आकनपल्लीवार, तुलसी प्रभागासंघ, सुनंदा वनकर, यशस्वी प्रभागसंघ कोषाध्यक्ष उपस्थित होते.
ग्रामीण भागातील महिलांच्या कलागुणांना वाव देणारा एक दिवसीय महोत्सव आयोजित करण्यात आला. या महोत्सवाला मूल तालुक्यातील नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. ग्रामीण भागातील खाद्यपदार्थांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर अन्य वस्तूंना मोठी मागणी आहे.
यावेळी मा. माजी अर्थमंत्री तथा विद्यमान आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी ग्रामीण भागात तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंसहायता समूह निर्माण झाले असल्याचे स्पष्ट केले. ग्रामीण भागात महिलांनी स्वयं रोजगारात मोठ्या प्रमाणात आघाडी घेतली असल्याचे त्यांनी सांगितले. सदर महोत्सवात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेला भाजीपाला, गांडूळ खत, दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क, ब्रह्मास्त्र, अग्निअस्त्र, पुरणपोळी, दंतमंजन, मशरूम पासून तयार केलेल्या विविध वस्तू, घरगुती शोभेच्या वस्तू, मिरची पावडर, हळद पावडर, ब्लॅक राईस ठेवण्यात आले होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी मा. माया सुमटकर तालुका अभियान व्यवस्थापक, मा. प्रकाश तुराणकर तालुका व्यवस्थापक, मा.निलेश जीवनकर तालुका व्यवस्थापक, मा. स्नेहल मडावी तालुका समन्वयक सेंद्रिय शेती, मा. जयश्री कामडी तालुका समन्वयक, मा. अमर रंगारी प्रभाग समन्वयक, मा. हेमचंद बोरकर प्रभाग समन्वयक, मा. रुपेश आदे प्रभाग समन्वयक (सेंद्रिय शेती ), मा. वसीम काजी प्रशासन सहाय्यक तथा लेखापाल, मा.मयूर गड्डमवार (कृषी व्यवस्थापक ), सौ .भावना कुमरे प्रभाग संघ व्यवस्थापक या यांनी परिश्रम घेतले