पुरुषांची मक्तेदारी मोडीत उमेद अभियानाच्या महिला ठरल्या लयभारी

उमेद अभियान चंद्रपूर
0

 मुल - महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मुल अंतर्गत भरारी महिला ग्रामसंघ बेंबाळ यांनी वर्षभरासाठी आठवडी बाजार व गुजरी ठेका घेतला आहे. आठवडी बाजार ठेका लिलाव प्रक्रियेत नेहेमी पुरुषांची मक्तेदारी असे. परंतु उमेद अभियानाच्या माध्यमातून आता महिला सर्व क्षेत्रात उतरल्या आहेत.

आठवडी बाजारात व्यापारी, शेतकरी व नानाप्रकारचे ग्राहक येतात बाजाराची फि घेण्यावरून अनेकदा वाद-विवाद होत असते. त्यामुळे बाजार ठेकेदारीत महिला रस घेत नही. या परंपरेला उमेद अभियान प्रेरित भरारी महिला ग्रामसंघ बेबाळ येथील महिलांनी आज छेद दिला आहे.

सर्वाधिक बोली लावून 81 हजार रुपयांनी ठेका आपले नावे करुण घेतला आहे. बेंबाळच्या महिला लिलाव प्रक्रियेत सरस ठरल्याने पुरुष मंडळींना रिकाम्या हाताने परतावे लागले. 16 मार्च 2021 ला बेबाळ येथील ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच कु. करुणा उराडे, ग्रामसेवक सुखदेवे साहेब, उपसरपंच मुन्नाभाऊ कोटरंगे व सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे उपस्थितीत आठवडी बाजार व गुजरी ठेका लिलावाची प्रक्रिया पार पडली. बोली लावणारे अनेक कंत्राटदार यावेळी उपस्थित होते त्यात पुरुषांची संख्या जास्त होती. आठवडी बाजाराची बोली सुरू झाली एकावर एक बोली लावणारे बोली लावत होते. शेवटी भरारी महिला ग्रामसंघ बेंबाळ यांनी 81 हजार रुपयांची सर्वाधिक बोली लावून ठेका आपले नावे करून घेतले.

सदर लिलाव प्रक्रियेदरम्यान भरारी महिला ग्राम संघाचे अध्यक्ष सौ. वंदना बोम्मावार, सचिव सौ.प्रणिता गड्डलवार, कोषाध्यक्ष सौ. रूपाली घोटेकर लेखापाल सौ. प्रियंका भंडारे ICRP विशाखा धाबर्डे सौ.कविता नीलमवार, ग्रामसंघातील इतर महिला व गावातील नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos