पंचायत समिती मुल येथे महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचा शुभारंभ

उमेद अभियान चंद्रपूर
0

 मुल : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती मूल अंतर्गत पंचायत समिती सभागृह येथे “महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान” चे तालुकास्तरीय मेळावा आयोजिन करून मान्यवरांच्या उपस्तीतीत साजरा करण्यात आला. ग्रामीण विकासामध्ये महिला सक्षमीकरण हा महत्त्वाचा विषय असून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून त्यांचे सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक राजकीय असे सर्वांगीण सक्षमीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी शासनामार्फत विविध योजनांच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील गरीब व जोखीम प्रवण महिलांना समृद्ध, आत्मसन्मानाने व सुरक्षित जीवन जगता यावे यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक लोकशाही तत्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करून त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा तसेच शाश्वत उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. महिलांच्या सर्वांगिन विकासासाठी व जागतिक महिला दिनानिमित्त अभियानामार्फत स्वयंसहायता समूहाच्या चळवळीची यशस्वी वाटचाल साजरी करण्यासाठी महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे. जागतिक महिला दिनानिमित्त अभियानामार्फत समुदाय संस्था ची यशस्वी वाटचाल साजरी करण्यासाठी जागतिक महिला दिन 8 मार्च 2021 ते जागतिक पर्यावरण दिन 5 जून 2021 या दरम्यान कालबद्ध पद्धतीने महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येत आहे.

तसेच अभियाना अंतर्गत कार्यरत कृषी/पशु/मस्त्य सखी , समुदाय संसाधन व्यक्ती, एम-सी.आर.पी.,उद्योग सखी,बँक सखी,कृती संगम सखी, कृषी व्यवस्थापक, सी-एल-एफ-व्यवस्थापक आदी महिलांचा मा.श्री. चंदुभाऊ मारगोनवर, सभापती,पं.स.मुल, श्री.मयूर कळसे, गट विकास अधिकारी, पं.स.मुल, श्री.डॉ. जांभुळे, पशु संवर्धन अधिकारी, पं.स.मुल, सौ.जगताप, सी.डी.पी.ओ., पं.स.मुल, श्री.किशोर चौधरी, कृषी अधिकारी, पं.स.मुल यांच्या हस्ते उमेद चे सम्मानचिन्ह देऊन त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला.

सदर कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणून मा. श्री चंदू भाऊ मारगोनवार सभापती पंचायत समिती मुल, कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. आरिफा भसारकर clf अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री.मयूर कळसे, गट विकास अधिकारी, पं.स.मुल, श्री.डॉ. जांभुळे, पशु संवर्धन अधिकारी, पं.स.मुल, सौ.जगताप, सी.डी.पी.ओ., पं.स.मुल, श्री.किशोर चौधरी, कृषी अधिकारी, पं.स.मुल, कु. माया सूमटकर, तालुका अभियान व्यवस्थापक, मुल,सौ.सुवर्णा आकानपल्लीवार, सौ.सिडाम,उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन कु. जयश्री कामडी, ता.स. यांनी केले असून उपस्थितांचे आभार सौ. भावना कुंभरे, सी-एल-एफ-व्यवस्थापक यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. नीलेश जीवनकर,तालुका व्यवस्थापक, श्री.प्रकाश तुरानकर, तालुका व्यवस्थापक, श्री.वसीम काझी,प्रशा.तथा सहा.लेखा , श्री. स्नेहल मडावी तालुका समन्वयक, श्री. हेमचंद बोरकर, श्री.रुपेश आदे, श्री.अमर रंगारी प्रभाग समन्वयक, श्री. मयूर भोपे, श्री. मयूर गड्डमवार, श्री. गिरीधर चरडूके यांनी सहकार्य केले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos