पोंभूर्णा येथे महा समृध्दी महिला सक्षमीकरण अभियान

उमेद अभियान चंद्रपूर
0

 पोंभूर्णा:- 08/03/2021 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून  व महासमृध्दी महिला सक्षमीकरण अभियानाची सुरुवात तालुका स्तरीय महिला मेळावा आयोजित करून मान्यवरांच्या उपस्थितीत पार पाडण्यात आले.      

             त्यानंतर देवाडा-केमार व चींतलधाबा- घोसरि प्रभागात ग्रामसंघ व प्रभाग संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला मेळाव्यात सर्व मान्यवर उपस्थित राहून विविध उपक्रमांचे उद्घाटन केलेत. त्यामध्ये घरकूल घराचे गृहप्रवेश, घरकूल बांध कामाच्या भूमीचे भूमिपूजन व   महिला उद्योजिका बनावेत व गरीब कुटुंबांना घरकूल बांधकामासाठी एकाच छताखाली सर्व साहित्य उपलब्ध व्हावेत यासाठी लक्ष्मी हार्डवेअर उत्पादक गट दीघोरी यांनी घरकुल मार्ट सुरू केलेत.   मा. राहुल कार्डिले सर, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. चंद्रपूर यांच्या संकल्पनेतून दुसरी  घरकुल मार्टची सुरवात तालुक्यात करण्यात आली.  सदर उत्पादक गटातील महिलांनी स्वनिधी 3 लाख 60 हजार रू गुंतवणूक केली. तसेच उमेद अभियानातून 1लाख रू निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आले. . मार्ट मध्ये सिमेंट, सळाख, सिमेंटची दारे खिडक्या, व घरबांधकामाला लागणारी सर्व साहित्य  तालुक्याच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहे. 

            CIF निधीतून ग्रामसंघ आंबे धानोरा यांना CLF मार्फत 3 लक्ष 80 हजार रुपयाचे चेक ,तसेच PG यांना 1लक्ष रुपयाचे चेक मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

          DDUGKY अंतर्गत मुले मुली मोठ्या संख्येनी प्रशिक्षण घेवून स्वतःच्या पायावर उभे व्हावेत याकरिता मागील महिन्यात तालुक्यातील 5मुली प्रशिक्षण पूर्ण करून हेद्राबाद येथे चांगल्या कंपनीत रुजू झालेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाने मुलींना समोर जाण्याची संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे तालुका कक्षा द्वारे त्या 5 मुलींच्या आईंचे शाल व श्रीफळ देवून  मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

          तसेच महिला दिनाचे औचित्य साधुन सन 2020-21 मध्ये राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार प्राप्त साई समूहाचे ( विभागीय  तृतीय क्रमांक)  शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले. सदर  सर्व उपक्रम मा.कु. अल्काताई  आत्राम मँडम, सभापती, मा.ज्योती ताई बुरांडे उपसभापती , मा.श्री. विनोदभाऊ देशमुख सदस्य यांचे शुभहस्ते तथा श्री साळवे सर BDO पं स. पोंभूर्णा  मा.कू मरसकोल्हे मॅडम ABDO यांच्या उपस्थितीत करण्यात आले.  प्रमुख पाहुणे मा. श्री अमोल मेरगळ सर CDPO, श्री राजेश एम. दुधे BMM उमेद , श्री. भीमटे सर IB/CB मा. सरपंच मॅडम तसेच प्रभाग समन्वयक उपस्तीत होते. आजच्या या कार्यक्रमा करिता  तालुक्याची उमेदची संपूर्ण टीम व  समूह संसाधन व्यक्ती, प्रभाग संघ व ग्रामसंघाचे सर्व पदाधिकारी व समूहातील महिलांच्या उपस्थितीत कार्यक्रम घेण्यात आले व  सर्वांनी  परिश्रम घेतले .

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos