राजूरा : महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियानाचे औचित्य साधून राजुरा तालुक्यातील आर्वी -पाचगाव प्रभागातील वरुर -रोड येथे प्रथमच महिलांच्या पुढाकाराने आठवडी बाजार सुरू झाला आहे आणि पहिल्याच दिवशी 14 हजाराची विक्री झाली सेंद्रिय पद्धतीने उत्पादित भाजीपाला , स्टेशनरी , कापड व्यवसाय, कडधान्य, खाद्य पदार्थ, ज्यूस सेंटर सह 11 समूहातील महिला यात सहभागी झाले होते. यामुळे स्थानिक खरेदीदार यांची सोय झाली आहे. उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, पंचायत समिती, राजुरा यांच्या अंतर्गत कार्यरत स्वयंसहायता समूहाच्या महिलांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी महिलांनी पुढाकार घेतला. संघटित महिला ग्रामसंघ व ग्रामपंचायत वरुर -रोड यांच्या सौजन्याने पार पाडण्याचे ठरविले दिनांक- 12/3/2021 रोजी शुक्रवार ला या बाजारपेठेचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मा.मुमताज जावेद शेख सभापती पं सं राजुरा,मा.श्री. मंगेश गुरनुले साहेब उपसभापती पंचायत समिती राजुरा ,प्रमुख पाहुणे मा. सौं. कुंदाताई जेणेकर माजी सभापती पंचायत समिती राजुरा ,विशेष अतिथी म्हणून जावेद शेख उपसरपंच देवाडा, श्री. रामदास पुसाम पं सं सदस्य राजुरा, सरपंच संगीता कोडापे वरुर रोड, उपसरपंच श्री. रमेश काळे, सचिव श्री. मरापे साहेब,सौं संध्या डोंगरे तालुका अभियान व्यवस्थापक, ग्राम पंचायत सदस्य उपस्तिथ होते.सदर मान्यवरांनी उपस्तित समूहातील महिलांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटित ग्रामसंघाच्या अध्यक्ष सौं. माधुरी पुसाम यांनी केले तर कार्यक्रम चे सूत्र संचालन वनिता लाटेलवार यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीते करिता साईकिरण धोटे प्रभाग समन्वयक , विश्वास बोढे CLM , ग्रामसंघ सर्व पदाधिकारी,सोनू कम्मलवार CRP यांनी सहकार्य के
ले.
Post a Comment
0Comments