सिंदेवाही कृषीसंशोधन केंद्रात अभ्यास सहल

उमेद अभियान चंद्रपूर
0
सिंदेवाही-( संकलन- विवेक नागरे, ता.अ.व्य.) : दिनांक 16/12/2019 ला तालुका अभियान कक्ष सिंदेवाही अंतर्गत कार्यरत कृषीसखी ,पशुसखी,व CRP यांची अभ्यास सहल कृषीसंशोधन केंद्र सिंदेवाही येथे नेण्यात आली.

सध्या शेतकऱ्यांची शेतीमध्ये रब्बी पिकाचे लागवड सुरु असून अभियान अंतर्गत समुहातील महिला किसान यांनी शेतीमध्ये रब्बी पिकाचे सुधारीत वाणाची लागवड करावी व त्यांना तसे मार्गदर्शन करता यावे, याकरिता सदर सहलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी कृषिसंशोधन केंद्र सिंदेवाही येथे लागवड करण्यात आली. वाटण्याचे वाण, हरभऱ्याचे वाण, गहू ,जवस, करडी, सुर्यफुल, ओवा, जीरा इत्यादी रब्बी पिकाची केलेली लागवड सर्वाना पाहायला मिळाली. श्री. डोंगरवार ,सहायक कृषी संशोधन अधिकारी, कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही यांनी लागवड केलेल्या पिकांविषयी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. कृषी सखी यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी विषयी माहिती जाणून घेतली. यावेळी कक्षातील तालुका अभियान व्यवस्थापक, सर्व तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक तसेच प्रभाग व्यवस्थापक

उपस्थीत होते

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos