वरोरा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियानाच्या
तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, वरोरातङ्र्के टेमुर्डा येथे आर्थिक समावेशन व्हावे, यासाठी २९ जानेवारी २०१९ रोजी बँक मेळावा घेण्यात आला.
अभियानाच्या वतीने नियमितपणे आर्थिक समावेशनासाठी वेगवेगळे
उपक्रम राबविले जाते. बँकातङ्र्के कर्ज उपलब्ध करून देणे हा या मागचा एक भाग आहे. परिसरातील टेमुर्डा
हे मध्यवर्ती गाव असल्याने येथे बँक मेळावा घेण्यात आला.
स्वयंसहायता समुहाना कर्ज वितरण करण्यासाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने हा मेळावा घेण्यात आला. यावेळी १२ समुहाचे
प्रस्ताव मंजूर करण्यात आले, तर २ समुहाना धनादेशाचे चेक वितरण करण्यात आले. यावेळी
पंचायत समितीचे विस्तार अधिकारी धुर्वे, बँक आँफ महाराष्ट्रचे शाखा
व्यवस्थापक पारखी, प्रभाग समन्वयक हर्षा नागतुरे उपस्थित होते. या मेळाव्यास
कर्ज प्रकरणे सादर करणाèया समुहाच्या जवळपास
१२० महिला उपस्थित होत्या. आयोजनासाठी हर्षा नागतुरे यांनी सहकार्य केले.