एकात्मिक शेती विकास प्रकल्पास भेट

उमेद अभियान चंद्रपूर
0

पोंभुर्णा : दिनांक २७/०४/२०२३ रोज गुरुवारला महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तालुका अभियान व्यवस्थान कक्ष पंचायत समिती पोभुर्णा अंतर्गत एकात्मिक शेती विकास प्रकल्प (IFC) क्लस्टर घाटकुळ येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद अंतर्गत चालू असलेल्या विविध उपजीविका, व्यवसायाची व गावत इतर सुरु असलेल्या उपक्रमाची पाहणी करण्याकरिता अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर माननीय डॉ. सुभाष पवार सर , गटविकास अधिकारी माननीय मरसकोल्हे  मॅडम, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर येथील जिल्हा अभियान व्यवस्थापक माननीय मनोहर वाकडे सर यांनी क्षेत्र भेट केली.  

या भेटी दरम्यान मा.अति मु का अ सरांनी उमेद अंतर्गत चालू असलेले विविध उपक्रम जसे रोपवाटिका, सेंद्रिय निविष्ठा विक्री केंद्र, किड नर्सरी, LSC कार्यालय इत्यादी प्रकल्पाची पाहणी केली. या दरम्यान संबंधित व्यवसाय करीत असलेल्या गटातील महिलांशी व्यवसायाबद्दल माहीती जाणुन घेतली. रोपवाटिका मध्ये झालेला खर्च व मिळणारे उत्पन्न याविषयी सरांनी महिलांची चर्चा केली. तसेच सेंद्रिय निविष्ठा डेमो युनिट उपक्रमाचे सुद्धा सरांनी नफा तोटा व  सेंद्रिय निविष्ठांचे फायदे याविषयी माहिती जाणून घेतली.

गावामध्ये प्रधानमंत्री आवास योजना , रमाई घरकुल, शबरी घरकुल, चे काम चालू असलेल्या घरांच्या    लाभार्थ्यांची भेट घेतली. त्यातील एक घरकुलाचे  मा. अति मु का अ सरांच्या हस्ते (श्री गोपाळा राऊत) उद्घाटन  करण्यात आले. मा. गटविकास अधिकारी  मरस्कोल्हे  मॅडम यांनी घरकुल लाभार्थ्यांशी संवाद साधून लवकरात लवकर घरकुलचे काम पूर्ण करावे याविषयी लाभार्थ्यांना मार्गदर्शन केले. या भेटी दरम्यान घाटकुळचे प्रथम नागरीक सरपंच मा. श्री. सुप्रीम गद्देकार, ग्रामसेवक मा खुशाब मानपल्लीवार कृषी अधिकारी मा. नितिन धवस , तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पोभुर्णा येथील श्री गजानन भिमटे तालुका व्यवस्थपक IBCB, श्री नोविद भडके तालुका व्यवस्थपक MIS, श्री सघंर्ष रंगारी cc-or, श्री निलेश अहीरकर प्रभाग समन्यवयक,  ग्रामसंघाच्या अध्यक्ष भाग्यश्री ताई देठे , प्रभागसंघ स्तरावरील सर्व कर्मचारी, केडर  व समुहातील सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos