कोरपना : दिनांक 13/04/2023 रोजी तालुका कोरपना येथे मा. अती. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री पवार सर यांनी मौजा थिप्पा येथे आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर, समता पर्व अभियान अंतर्गत आरोग्य शिबिरास उपस्थिती दर्शविली. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत मांगलहिरा येथील ग्रामसंघा अंतर्गत सुरू असलेल्या मोह संकलन व्यवसाय व पिपर्डा येतील
सूनहरी सॅनिटरी पॅड व्यवसायास भेट देवून व्यवसाय पाहणी सोबतच उत्पादित वस्तू यांचा दर्जा वाढवून यांना बाजार पेठ उपलब्ध बाबत सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच पंचायत समिती कोरपना अधिकारी ,कर्मचारी यांचा आढावा घेण्यात आला. यावेळी समाज कल्याण अधिकारी, मा. श्री पेंदाम साहेब मा.जिल्हा व्यवस्थापक IBCB , तुरणकर सर सवर्ग विकास अधिकारी मा. श्री पेंदाम सर, मा.कृषी अधिकारी, श्री दुधे सर पेसा समनव्यक भोयर सर , प. स. कोरपना येथील सर्व कर्मचारी, उमेद टीम, आरोग्य विभाग टीम, ग्राम संघ पदाधिकारी, उपस्थित होते.