क्षेत्रभेटीदरम्यान मारोडा येथे भेट देण्यात आली यामध्ये पुढील बाबींची भेट व मार्गदर्शन करण्यात आले. वर्मी वॉश ,उत्पादित गांडूळ खत, याविषयक पाहणी करून पुढील नियोजन सांगितले तसेच प्रचार प्रसिद्धी व मार्केटिंग नियोजन, हंगामानुसार शेती शाळा इत्यादीवर डेमो युनिट विषयक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रभाग संघ अध्यक्षांच्या माध्यमातून पापड पापड निर्मिती विषयी माहिती घेण्यात आली त्याचबरोबर उत्पादित झालेला मालाचा खरेदी व विक्री कसे करावी याबद्दल सखोल मार्गदर्शन तसेच मार्केटिंग मध्ये आवश्यक बाबी उदाहरणार्थ पापडाची चव ,आकार, पॅकिंग ,लेबलिंग, ब्रँडिंग , खरेदी - विक्री याविषयी मार्गदर्शन करण्यात आले तसेच आवश्यक असणारे दुकानांमधून डिमांड यादी मागणी करण्याविषयीचे नियोजन करण्यात आले व त्यानुसार पुढील नियोजना विषयी माहिती देण्यात आली
याप्रसंगी तालुका अभियान व्यवस्थापक माननीय श्री.नितीन वाघमारे सर, वृंदावन प्रभाग संघाचे अध्यक्ष पठाण मॅडम , राजोली-मारोडा प्रभागाचे प्रभाग समन्वयक श्री. सिद्धार्थ वाडके सर तसेच श्री. रुपेश आदे प्रभाग समन्वयक सेंद्रिय शेती तसेच गावातील संपूर्ण कॅडर व महिला उपस्थित होते.