मोरवा येथे तृणधान्य खादयपदार्थ उत्सव व पोषण सप्ताह
October 06, 2022
0
चंद्रपूर : दि.28/09/2022 ला ICDS विभाग व तालुका अभियान कक्ष पंचायत समिती चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोरवा येथे "मिलेट्स खाद्यपदार्थ महोत्सव" व पोषण अभियान 2022 अंतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .सदर कार्यक्रमाला मा. अजय गुल्हाने सर,जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर , मा.वर्षा गौरकर मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.चंद्रपूर, मा.शिंदे सर, Dy.CEO,ICDS विभाग, जि.प.चंद्रपूर,मा. आशुतोष सपकाळ सर, गट विकास अधिकारी पंचायत समिती चंद्रपूर, मा.जगताप मॅडम,CDPO,ICDS विभाग मा.वाकडे सर,DMM,DMMU चंद्रपूर , मा.सरपंच, उपसरपंच ,प्रभाग संघ व ग्राम संघ पदाधिकारी ची उपस्थिती होती. कार्यक्रम ला उपस्थित मान्यवर च्या आगमन वेळी संविधान ग्रामसंघ किटाली च्या महिलांनी लेझिम नृत्य सादर केले त्यानंतर मा. अजय गुल्हणे सर, जिल्हाधिकारी यांच्या हस्ते फीत कापून कार्यक्रम चे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांनी उपस्थित महिला ना पोषण अभियान बाबत,आरोग्य,आहारा मधे तृणधान्य चे महत्व या बाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच सुदृढ बालक स्पर्धा मध्ये विजेते बालकांना पारितोषिक देवून गौरविण्यात आले.सदर महोत्सवात महिलांनी ज्वारी,नाचणी, मका पासून विविध पदार्थ जसे की नाचणी पासून तयार केलेली इडली, विविध प्रकारचे पराठे, गव्हापासून तयार केलेले शंकरपाडे, ज्वारी पासून तयार केलेला पोष्टीक उपमा,विविध प्रकारच्या उसळ, ज्वारी चे पकोडे, ज्वारी पासून तयार केलेली चकली , नाचणी ची खीर असे ई विविध पदार्थ बनवून महिलांनी उत्सवात उत्स्फूर्त पणे सहभाग घेतला, त्या सोबतच विविध कडधान्य व तृणधान्य चे स्टॉल लावण्यात आले होते. कार्यक्रमाची सांगता मा. वर्षा गौरकर मॅडम, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आली. सदर कार्यक्रम ला तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर ची सर्व टीम, सर्व CTC व महिला उपस्थित होत्या. अश्या प्रकारे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.