उमेद पोंभुरणा तर्फे दिवाळी फराळ महोत्सव

उमेद अभियान चंद्रपूर
0

पोंभुरणा : आज दिनांक 17 ऑक्टोबर 2022 ला नगर पंचायत परिसरात दिवाळी फराळ पाच दिवसीय महोत्सवाचे आयोजन मा वळवी साहेब गट विकास अधिकारी प.स पोंभुरणा व मा राजेश दुधे तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पोंभुरणा यांचे मार्गदर्शनात करण्यात आले. या दिवाळी फराळ महत्त्वाचे उद्घाटन माननीय सुलभाताई पिपरे नागराध्यक्ष नगर पंचायत पोंभुरणा यांचे हस्ते फीत कापून करण्यात आले.

दिवाळी निमित्त विविध वस्तूची खरेदी करताना ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी उत्पादित केलेले खाद्यपदार्थ व इतर वस्तू यांची खरेदी करून ग्रामीण भागातील महिलांच्या उत्साह वाढवावा व त्यांच्या उत्पन्नात वाढ करावी असे आवाहन श्री. गजानन भिमटे तालुका व्यवस्थापक यांनी केले.

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत पोंभुरणा तालुक्यातील स्वयंसहायता समूह कार्यरत असून यातील अनेक महिला नाविन्यपूर्ण वस्तूची निर्मिती करतात दिवाळीच्या पार्श्वभूमीवर महिलांकडून विविध खाद्यपदार्थ व सजावटीच्या वस्तू विक्रीस ठेवल्या आहेत.

नगर पंचायत दुकान गाढे परिसरात दिनांक 17 ऑक्टोंबर ते 21 ऑक्टोबर या पाच दिवसीय कालावधीमध्ये दिवाळी फराळ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत. या  पाच दिवसांमध्ये विविध वस्तू विक्रीस असणार आहेत भेट देणाऱ्या ग्राहकांनी ग्रामीण भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या विविध वस्तू खरेदी कराव्यात जेणेकरून ग्रामीण भागातील महिलांच्या घरातही आनंद पोहोचेल असे आवाहन स्मिता आडे फारवर्ड लिंकेज यांनी केले. उमेद टीम (सर्व प्रभाग समनव्यक, व्यवस्थापक, कॅडर) यांनी स्टॉल उभारणीसाठी परिश्रम घेतले आहे

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos