ब्रहमपुरी : शासनामार्फत स्वयंसहायता समूहांना व्यवसाय करण्याकरिता प्रवृत्त करण्यासाठी नवनवीन उपक्रम राबवीण्यात
येत असून याचाच एक भाग म्हणून दिनांक 17/10/2022 ते 21/10/2022 या कालावधीत स्वयंसहायता समूहांनी तयार केलेला दिवाळी फराळ व आकर्षक शोभेच्या वस्तू विक्री व प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक 18/10/2022 ला तहसीलदार उषा चौधरी मॅडम यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला प्रसंगी तहसीलदार उषा चौधरी मॅडम यांनी स्वतः दिवाळी फराळ खरेदी करून उपस्थितांना सदर दिवाळी फराळ व प्रदर्शनीचा लाभ घेण्यास सांगितले,सदर प्रदर्शनी मध्ये तालुक्यातील स्वयंसहायता समूहातील महिलांनी विविध प्रकारच्या वस्तू विक्रीकरिता आणलेल्या होत्या,सूत्र संचालन प्रभाग समन्वयक प्रविण सायंकार यांनी केले तर आभार प्रदर्शन गोपीका येटे यांनी केले.
कार्यक्रमास उपस्थित तालुका अभियान व्यवस्थापक मनोज मेश्राम सर,पशू संवर्धन अधिकारी रामटेके सर,शिक्षण विस्तार अधिकारी शेळके मॅडम,राऊत मॅडम, पेटकर मॅडम, वाघमारे मॅडम,कृषी अधिकारी मोकशे सर,तालुका व्यवस्थापक MIS दिनेश जांभूळकर सर, प्र.स.- सेंद्रिय शेती सुधीर ठेंगरी,पशू व्यवस्थापक बनकर, बारसागडे , Crp व सहभागी स्वयं सहायता समूह महिला.