मूल येथे अगरबत्ती मशीन वाटप व प्रशिक्षण

उमेद अभियान चंद्रपूर
0

मूल : आज दिनांक १०/०५/२०२२ रोजी आझादी का अमृत मोहत्सव अंतर्गत महिलांची उपजीविका वाढविण्यासाठी तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष मुल व महारोगी सेवा समिती वरोरा व विश्वशरय्या राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था नागपूर यांच्या सयुक्त विधमानाने  यांचे कडून अगरबत्ती मशीन वाटप व एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम महारोगी सेवा समिती वरोरा (सोमनाथ प्रकल्प)येथे आयोजित कऱण्यात आली होती. यशस्वी महिला प्रभाग संघ संस्था चिरोली या प्रभाग अंतर्गत येणाऱ्या 20 महिलांना अगरबत्ती कशी बनवायची तसेच पॅकेजिंग, ब्रॅण्डिंग व मार्केटिंग कशी करायची यावर महिलांना प्रशिक्षण देण्यात आले व त्यानंतर महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले व 20 महिलांना प्रत्येकी एक या प्रमाणे 20 अगरबत्ती बनवायांची मशीन 100% अनुदानावर संस्थेच्या मार्फत  वाटप करण्यात आले. तसेच महिलांना कच्चा माल खरेदी करण्यासाठी प्रत्येकी 1000 रुपये याप्रमाणे 20000 रुपये देण्यात आले.

सदर कार्यक्रमाला VNIT चे संचालक मा. डॉ. दिलीप पेशवे सर महारोगी सेवा समिती वरोरा येथून मा. पल्लवी आमटे मॅडम , मा.प्रा.मंजूषा ठावरे मॅडम जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष चंद्रपूर येथून जिल्हा व्यवस्थापक (mis) मा. भांडारकर सर  सोमनाथ प्रकल्प मधून मा. रोहित फडतरे सर , तालुका अभियान व्यवस्थापण कक्ष मुल येथून मा. नितीन वाघमारे सर (bmm) मुल ,निलेश जीवनकर (bm-mis),जयश्री कामडी (bc-fl), अमर रंगारी प्रभाग समनव्यक , मयूर गडमवार (cam) व महिला उपस्थित होते

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)
Videos Photos