पोंभुर्णा : जागतिक महिला दिनाचे औचित्य पोंभुर्णा येथे कॉप शॉपचे उदघाटन करण्यात आले.
जागतिक महिला दिनानिमित्त व आजीविका वर्ष सुरुवात म्हणून तालुका पोंभूर्णा जिल्हा चंद्रपूर तर्फे तालुका स्तरीय प्रदर्शनी चे उद्घाटन मा.कु.अल्का ताई आत्राम सभापती मॅडम, मा.सो.बुरांडे मॅडम उपसभापती तसेच सर्व पंचायत समिती सदस्य गण मा.कलोडे सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रपूर , मा.श्री. धंनजय साळवे सर,गट विकास अधिकारी व इतर मान्यवर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तसेच डेमो हाऊस मध्ये कॅप शॉप सुरुवात करण्यात आले.त्यामधे विविध समूहातील महिलांच्या हस्ते तयार करण्यात आलेल्या विविध वस्तू विक्री साठी ठेवण्यात आले. त्यामध्ये हळद,तिखट , धनीया पावडर, शेवगा, कडीपत्ता, बाभूळ दंत मंजन पावडर, विविध कडधान्ये, तूप,पापड,मशरूम चे पदार्थ,मत्स्य लोणचे,कार्यालयीन फाईल ,ह्यांड लूम ज्वेलरी, विविध शोभिवंत वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात आलेले आहेत