नागभीड :
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती नागभीड यांच्या मार्गदर्शनातून आस्था महिला ग्रामसंघ, बाळापुर खुर्द मौशी-कांपा प्रभाग व ग्रामपंचायत बाळापुर खुर्द यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 21 फेब्रुवारी 2022 रोज सोमवारला आठवडी बाजाराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन सोहळ्याचे वेळी गावातील १४ स्वयंसहायता समूहातील महिला व गावातील नागरिक उपस्थित होते. या आठवडी बाजाराच्या माध्यमातून उत्पादक, विक्रेते व ग्राहक यांना स्थानिक बाजारपेठ उपलब्ध झाल्याबाबत त्यांनी आनंद व्यक्त केला.आठवडी बाजार सुरू करण्यामागचा उद्देश गावातील उत्पादीत मालाची गावात विक्री करता यावी, गावकऱ्यांचे वेळ व श्रम कमी व्हावे तसेच दळणवळणाचा खर्च कमी व्हावा हा आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून मा.श्री. कमलाकरजी ठवरे, सरपंच, ग्रा.पं. बाळापुर खुर्द, उद्घाटक मा.श्री. खोजरामजी मरस्कोल्हे,जि.प.सदस्य, तळोधी- गोविंदपूर प्रभाग, प्रमुख पाहुणे मा.सौ. रागिनीताई गुरपुडे, उपसभापती, पंचायत समिती, नागभीड, मा.श्री. सरोजजी मेश्राम, उपसरपंच, ग्रा.पं. बाळापुर खुर्द, मा.श्री. मनोहरजी नागतोडे, मा.सौ. प्रतिभाताई वांढरे, मा.सौ. संध्याताई सोनकर , मा.सौ. मनिषाताई बगमारे, मा.सौ. रेखाताई बांबोळे, ग्रा.पं. सदस्य, मा.श्री. पुरुषोत्तमजी मलोडे, अध्यक्ष, तंटामुक्त समिती, मा.श्री. रामप्रसादजी दुपारे, माजी अध्यक्ष, तंटामुक्त समिती, मा.श्री. युवराजजी गोंगल, पोलीस पाटील, मा.सौ. मंदा बळीराम बगमरे, माजी सरपंच, , मा.सौ. सुनंदा घोटे कर, अध्यक्ष, सहेली ग्राम संघ, चिकमारा, मा.सौ. अनिता प्रमोद नागतोडे, अध्यक्ष, आस्था महिला ग्रामसंघ, मा.सौ. स्वाती बारसागडे, सचिव, आस्था महिला ग्रामसंघ, मा.सौ. वंदना प्रकाश गोंगल, कोषाध्यक्ष, आस्था महिला ग्राम संघ, मा.श्री. मार्कंड जी राऊत, प्रतिष्ठित नागरिक, मा.श्री. तुकडोजी बांबोळे, माजी शिक्षक, मा.श्री. केशवजी मेश्राम, माजी ग्रामपंचायत सदस्य, मा.सौ. विमल राऊत, अंगणवाडी सेविका, मा.श्री. शीलवंत सोनटक्के, रोजगार सेवक व श्री.अमोल मोडक, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती, नागभीड उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक कु. ज्योती साळवे, प्रभाग समन्वयक,मौशी-कांपा प्रभाग यांनी केले. उद्घाटन सोहळ्याचे आभार प्रदर्शन सौ. प्रतिभा वांडरे समूह संसाधन व्यक्ति यांनी केले