महिलांनी निर्माण केलेल्या वस्तूची योग्य प्रकारे प्याकेजिंग, ब्रँडिंग करून त्यांना ग्राहकापर्यंत पोहचविण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची आवश्यकता असल्यामुळे कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया उधोग योजनेअंतर्गत मंजूर झालेले व्यवसाय यांचे योग्य प्रकारे व्यवसाय वृद्धिंगत होण्याच्या दृष्टीने समूहातील महिलांना प्रशिक्षण देण्यात आले.
चिमूर येथे विपणन विषयावर एकदिवसीय कार्यशाळा
January 07, 2022
0
चिमूर :आज दिनांक 7 जानेवारी 2022 ला पंचायत समिती सभागृह चिमूर येथे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष, पंचायत समिती चिमूर अंतर्गत स्वयंसहाय्यता समूह याचे द्वारे निर्मित विविध वस्तू तसेच वैयक्तिक व्यवसाय करणाऱ्या महिलांना स्वतः उत्पादित करीत असलेल्या वस्तुंना योग्य बाजारपेठ मिळावी व नवनवीन व्यवसाय निर्मिती व्हावी या उद्देशाने जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, चंद्रपूर यांचे द्वारे विपणन व मार्केटिंग या विषयावर पंचायत समिती सभागृह चिमूर येथे एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.