राजुरा : आज दिनांक -24/01/2022 रोज सोमवार ला तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष बी आर सी सभागृह राजुरा येथे विपणन विषयावर एक दिवसीय जिल्हा स्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यशाळेला मा.सुनंदा डोंगे मॅडम (जि. प. सदस्य ) , मा. मोकासे सर ( प्रमुख मार्गदर्शक ) , मा. संध्या डोंगरे (BMM) , भडके सर ( BM-MIS) , नगराळे सर (Bm -Fi), माधुरी पडवे( Bm- Ibcb ) अमित भगत (CC) ,विश्वास बोधे( CLM ) शिला कोटनाके (प्रभाग संघ अध्यक्ष) उपस्थित होते.
प्रमुख मार्गदर्शक- मा. मोकासे सर यांनी विपणन विषयावर सविस्तर माहिती दिले. उद्योग कसा करावा, उद्योग निवड कशी करावी, प्रॉडक्ट ची ब्रँडिंग , लेबलिंग , पॅकेजिंग, या विषयावर मार्गदर्शन केले. बाजारपेठेत आपली वस्तू कशी आणावी , नवनवीन उद्योग कसे उभारावे, व्यवसाय करतांना येणाऱ्या अडचणी, व त्या अडचणींवर मात कसे करावे, अभियानाच्या माध्यमातून सामूहिक व वैयक्तिक व्यवसाय कसा करावा, लहान उद्योग बाजारपेठेत कसा टिकवावा व त्याला मोठा कसा करावा इत्यादि विषयावर मार्गदर्शन केले. प्रशिक्षणाच्या शेवटी प्रशिक्षणार्थी सोबत प्रश्न-उत्तराच्या माध्यमातून चर्चा करून अनेक प्रश्नाचे निरासरण करण्यात आले. सदर कार्यशाळेचे संचालन कु. माधुरी पडवे ibcb , प्रास्ताविक कु संध्या डोंगरे ( bmm) आभार प्रदर्शन श्री अमित भगत प्रभाग समन्वयक यांनी केले