परसोडा येथे नाविण्यपुर्ण वैरण विकास कार्यक्रम
January 24, 2022
0
वरोरा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत ग्राम पंचायत परसोडा व सहानुभूती ग्रामसंघ यांचे वतीने राबविण्यात येत असलेल्या समुदायासाठी वैरण गवत (Silvipachar Gassland) लागवड विकास या नाविन्यपूर्ण उपक्रमास आज दिनाक २१ जानेवारी २०२२ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी मा. डॉ.मिताली शेठी मॅडम यांनी भेट दिली. त्यावेळी उपस्थित ग्रामसंघ प्रतिनिधी आणि ग्राम पंचायत पदाधिकारी यांचेशी चर्चा करून प्रकल्प समजून घेतला . त्यानंतर प्रत्यक्ष लागवड केलेल्या गवताची पाहणी केली. या उपक्रमामुळे समूहाच्या महिला व ग्राम पंचायत चे उत्पन्नात वाढ होईल असा विश्वास व्यक्त केला. त्यावेळी अतिरिक्त मु.का.अ. मा.श्री.कपिल कलोडे सर, गट विकास अधिकारी मा.श्री.राजेश राठोड सर, सरपंच संदीप दडमल व पशु संवर्धन, कृषी, नरेगा विभागाचे अधिकारी आणि उमेद तालुका टीम व कॅडर उपस्थित होते.